AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगी इथे नाहीये अन् बापाचं कौतुक होतंय, सुप्रिया सुळे यांचं कौतुक करताना शरद पवार गलबलले

"सुप्रिया सुळे यांच्या मुलाचे कॅनवोकेशन लंडनला आहे. आज संध्याकाळी विमानाने तिकडे निघत आहेत. त्यामुळे त्या इकडे नाहीत. मुलगी इथे नाहीये आणि बापाचे कौतुक चाललं आहे. इथे कुणाला एक मुलगी आहे का? एकच मुलगी असल्याने अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात", असं शरद पवार म्हणाले.

मुलगी इथे नाहीये अन् बापाचं कौतुक होतंय, सुप्रिया सुळे यांचं कौतुक करताना शरद पवार गलबलले
शरद पवार आणि सुप्रिया सुळे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 11, 2024 | 10:00 PM
Share

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आज त्यांच्या कन्या तथा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कौतुक करताना काहीसे भावनिक झालेले बघायला मिळाले. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी जास्त चुरशीची झाली. विशेष म्हणजे पवार कुटुंबातीलच दोन महिलांमध्ये ही निवडणूक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या लेक तथा अजित पवार यांच्या बहीण सुप्रिया सुळे या मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात होते. दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. अखेर या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. या विजयानंतर सुप्रिया सुळे यांचं बारामती लोकसभा मतदारसंघात अभिनंदन केलं जात आहे.

शरद पवार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काय म्हणाले?

बारामतीत डॉक्टरांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवारांनी सर्व डॉक्टरांना संबोधित केलं. यावेळी ते सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना गलबलले. “सुप्रिया सुळे इथे असणे अपेक्षित होतं. सुप्रिया सुळे यांच्या मुलाचे कॅनवोकेशन लंडनला आहे. आज संध्याकाळी विमानाने तिकडे निघत आहेत. त्यामुळे त्या इकडे नाहीत. मुलगी इथे नाहीये आणि बापाचे कौतुक चाललं आहे. इथे कुणाला एक मुलगी आहे का? एकच मुलगी असल्याने अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. अधिवेशन काळात वेगवेगळ्या पक्षाचे खासदार आमच्या घरी असतात. त्यांच्याशी संवाद सुप्रियाने ठेवला आहे”, अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्या लेकीचं कौतुक केलं.

“मी 14 वेळा निवडणूक लढलो. काही निवडणुका संघर्षाची होती. बारामतीकरांचे वातावरण नेहमी वेगळे असते. त्याकाळी लोकांमध्ये तारतम्य होतं. आम्ही टीका करताना शब्दांची मर्यादा ठेवून टीका करायचो. बारामतीची निवडणूक वेगळी होती. जेव्हा मी सभेला जातो तेव्हा मी समोर बसलेल्या लोकांच्या डोळ्यात पाहतो त्यावरुन मला अंदाज येतो. बारामती मतदारसंघाची चिंता मला वाटत नाही”, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.

Follow Us
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!