AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी मेळाव्यात शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, सत्ता कशी हातात येत नाही, तेच बघतो…

Sharad pawar on Maharashtra Vidhansabha Election 2024 : शरद पवार हे सध्या बारामती तालुक्याचा दौरा करत आहेत. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही शरद पवारांनी भाष्य केलंय. वाचा सविस्तर...

शेतकरी मेळाव्यात शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, सत्ता कशी हातात येत नाही, तेच बघतो...
Sharad pawar Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 19, 2024 | 12:44 PM
Share

लोकसभा निवडणूक संपताच शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. मागचे दोन दिवस शरद पवार बारामतीत आहेत. यावेळी ते शेतकरी मेळाव्यांना हजेरी लावत आहेत. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलंय. आज दोन्ही सरकारं आमच्या हातात नाहीत. पण कालच्या निवडणुकीत जसं काम झालं तसं काम केलं. तर राज्य सरकार कसं आपल्या हातात येत नाही, तेच मी बघतो. लोकसभेला जे योग्य होतं ते तुम्ही केलं. विधानसभेला सुद्धा जे योग्य आहे ते करा, असं आवाहन शरद पवारांनी केलंय.

शरद पवारांचा दौरा

शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील खांडज गावाला भेट दिली. शेतकरी मेळाव्यासाठी ते हजर होते. या गावातून अनेकांना मोठं करण्याचा प्रयत्न केला. सत्ता येते. सत्ता जाते सुध्दा… पण आलेली सत्ता लोकांच्या जीवनात बदल करण्यासाठी वापरली तर लोकं आठवण ठेवतात, असं शरद पवार यांनी म्हटलं.

निवडणूक अन् गावचं राजकारण

काही लोकं तात्पुरते यशस्वी होतात. मी नेहमी सांगतो, देशात लोकशाहीचं राज्य आहे. या निवडणुकीत वेगळं चित्र होतं. गावचे नेते कुठे होते कोणास ठाऊक? ज्यांना मोठं केलं ते आसपास दिसत नव्हते. मतमोजणी जेव्हा झाली. तेव्हा कळलं की गाव मोठ्या नेत्यांच्या हातात नाही. तुम्हाला निवडणुकीत माहिती होतं काय करायचं. आता आमची जबाबदारी आहे. तुमचं पाणी इतकं खराब आहे की त्यात हात पण नाही घालता येतं. हे पाणी कसं नीट करता येईल, असंही शरद पवार म्हणाले.

सुप्रिया सुळेंना तुम्ही विजयी केलं. महाराष्ट्रात कुठे ही गेलो तरी चर्चा असायची की बारामतीत काय होणार आहे. लोकांना चिंता वाटायची जेव्हा मतपेटी उघडली तेव्हा कळालं. आपल्या वाटा या वहिवाटीच्या बाहेर जात नाहीत. मी तुम्हाला एवढी खात्री देतो. तुम्हा लोकांच्या मतदारसंघाच नाव हे त्या ठिकाणी गाजवल्याशिवाय राहणार नाहीत, असा शरद पवारांनी दिला.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.