मोहन भागवतांनी माझ्या ज्ञानात भर घातली, भागवतांच्या ‘त्या’ विधानावरून शरद पवारांचा खोचक टोला

अश्विनी सातव डोके

| Edited By: |

Updated on: Sep 07, 2021 | 2:15 PM

हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते. आपण सर्व हिंदूच आहोत, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. (sharad pawar)

मोहन भागवतांनी माझ्या ज्ञानात भर घातली, भागवतांच्या 'त्या' विधानावरून शरद पवारांचा खोचक टोला
sharad pawar

Follow us on

पुणे: हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते. आपण सर्व हिंदूच आहोत, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. भागवत यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तिरकस प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भागवतांच्या विधानाने माझ्या ज्ञानात भर पडली, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे. (sharad pawar taunt Rss Chief Mohan Bhagwat)

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी मोहन भागवतांच्या विधानाची खास शैलीत खिल्ली उडवली. चांगली गोष्ट आहे. भागवत सर्व धर्म एकच समजतात. दोन्ही समाजाचा मूळ जन्म एकाच कुटुंबातून झाला ही नवीन गोष्ट त्यांनी सांगितली. माझ्याही ज्ञानात भर पडली ते वाचून, असा चिमटा पवारांनी काढला.

भागवत कुठले डॉक्टर?

याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भागवतांवर टीका केली होती. मोहन भागवत कुठले डॅाक्टर आहेत ते तपासावे लागेल, संविधानात समभावाची भावना विशद करण्यात आली आहे. सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसने मांडली आहे. रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा सर्व धर्म समभाव असं मोहन भागवत बोलले असते तर त्याचं स्वागत केलं असतं, असा टोलाही पटोले यांनी लगावला होता.

काय म्हणाले मोहन भागवत?

मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात हिंदू असो वा मुस्लिम आपले पूर्वज एकच असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येक भारतीय हा हिंदू आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील विद्वानांनी कट्टरपंथीयांविरोधात उभं राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले होते. तसेच ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करून त्यांच्यात भांडणं लावली. मुस्लिम कट्टरपंथीय असल्याचं हिंदूंना सांगून ब्रिटिशांनी भांडणं लावली. त्यातच दोन्ही समाजात एकमेकांवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे त्यांनी कधीच एकमेकांसमोर आपलं म्हणणं मांडलं नाही. म्हणून दोन्ही समाजात अंतर निर्माण झालं. आता आपण आपला दृष्टीकोण बदलला पाहिजे, असं भागवत म्हणाले होते.

डीएनए चेक करा, आम्ही तयार

भागवत यांच्या या विधानावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार टीका केली आहे. आमचा डीएनए टेस्ट करा. आम्ही तयार आहोत. मात्र, आमचा डीएनए तपासताना तुम्हाला तुमचाही डीएनए तपासावा लागेल. आता ही वेळ आली आहे. हे लोक भारताचं संविधान मानणार नाहीत. पण डीएनए टेस्ट करतील. संघवाल्यांना इतिहासाचं अपूरं ज्ञान आहे, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. (sharad pawar taunt Rss Chief Mohan Bhagwat)

संबंधित बातम्या:

मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल; नाना पटोलेंचा टोला

सहकार क्षेत्र संपवण्याचं केंद्राचं षडयंत्र; आरबीआयच्या नव्या धोरणाला शरद पवारांचा कडाडून विरोध

विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर, काळ जाईल तेव्हा बघू; ईडीच्या कारवायांवरून शरद पवारांचा इशारा

(sharad pawar taunt Rss Chief Mohan Bhagwat)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI