AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Metro : पुणे मेट्रोच्या ‘कनेक्टिव्हिटी’ सुरु केला हा उपक्रम, आता मेट्रोस्थानकापर्यंत असे जाता येणार

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन केले होते. त्यांनी उद्धाटन करुन आता आठवडा उलटला आहे. पुणेकरांनी मेट्रोला चांगला प्रतिसाद दिल्याचे आकडेवारीवरुन समोर आले. आता प्रवाशांची दुसरी अडचणही दूर केलीय.

Pune Metro : पुणे मेट्रोच्या 'कनेक्टिव्हिटी' सुरु केला हा उपक्रम, आता मेट्रोस्थानकापर्यंत असे जाता येणार
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 10, 2023 | 8:44 AM
Share

योगेश बोरसे, पुणे | 10 ऑगस्ट 2023 : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी मेट्रोच्या दोन मार्गाचे उद्घाटन केले. त्यानंतर सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे पुणे मेट्रोचे दोन मार्ग पुणेकरांसाठी सुरु झाले. परंतु प्रवाशांना सर्वात मोठी अडचण मेट्रो स्थानकापर्यंत जाण्याची येत होती. अनेक मेट्रो स्थानकावर वाहनतळ नाही, तसेच सरळ बसची फिडर सेवाही नाही, यामुळे मेट्रो स्थानकावर जावे कसे, हा प्रश्न अनेकांना पडत होता. त्याला उत्तर मिळाले आहे.

काय सुरु केले

मेट्रोसाठी शेअर रिक्षा सुरु करण्याचा निर्णय झालाय. पुणे, पिंपरी चिंचवडमधील १८ स्थानकांपासून परिसरातील शेअर रिक्षाचे प्रवासी भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केले आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी त्वरित सुरु करण्याचे म्हटले आहे. शेअर रिक्षांचे प्रवासी भाडे ठरवण्यासाठी पुणे रिक्षा पंचायत, पुणे ऑटो रिक्षा फेडरेशन आणि इतर सर्व संघटनांची बैठक झाली.

सर्वेक्षण करुन निर्णय

बैठकीनंतर शहरात सर्वेक्षण झाले. रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर शेअर रिक्षाचे भाडे जाहीर केले. आता दहा किलोमीटरपर्यंत शेअर रिक्षांची वाहतूक होणार आहेत. अनेक स्थानकांपर्यंत जाण्यासाठी बस सेवा नाही. तसेच मेट्रो स्थानकापर्यंत स्वता:च्या वाहनेने गेल्यास ते वाहन लावण्यासाठी वाहनतळ नाही. यामुळे प्रवाशांची अडचण होत होती.

असे असेल शेअर रिक्षाचे भाडे

वनाज ११ ते २७
आनंदनगर ११ ते ४३
आयडीयल कॉलनी १२ ते ३७
नळस्टॉप ११ ते २२
गरवारे कॉलेज १२ ते १५
महापालिका भवन १२ ते २७
शिवाजीनगर न्यायालय ११
मंगळवार पेठ (आरटीओ) ११ ते ३७
पुणे स्टेशन ११ ते २१
रुबी हॉल ११ ते ३०
शिवाजीनगर एसटी स्थानक ११ ते ३०
बोपोडी १४ ते ४९
दापोडी १५ ते ३५
फुगेवाडी २५ ते ३०
कासारवाडी १७ ते २५
भोसरी, नाशिक फाटा १३ ते ३६
संत तुकारामनगर १२ ते ३४
पिंपरी चिंचवड १३ ते ७९

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?