AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात आजी-माजी आमदार आमनेसामने, जोरदार खडाजंगी, तणावाचं वातावरण, नेमकं काय घडलं?

जुन्नरचे आजी-माजी आमदार रस्त्याच्या भूमिपूजन करण्यावरुन समोरासमोर भिडले आहेत. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची कार्यक्रमस्थळी प्रचंड घोषणाबाजी केली.

पुण्यात आजी-माजी आमदार आमनेसामने, जोरदार खडाजंगी, तणावाचं वातावरण, नेमकं काय घडलं?
| Updated on: Aug 06, 2023 | 12:02 AM
Share

पुणे | 5 ऑगस्ट 2023 : जुन्नरचे आजी-माजी आमदार रस्त्याच्या भूमिपूजन करण्यावरुन समोरासमोर भिडले आहेत. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची कार्यक्रमस्थळी प्रचंड घोषणाबाजी केली. शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनवणे विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांच्यात रस्त्याच्या भुमीपूजनावरुन चांगलाच वाद उफाळलेला बघायला मिळाला. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात संबंधित प्रकार घडला. चर्चा करायची नसेल तर मला गरज नसल्याचे शरद सोनवनेंनी बेनकेंना फटकारले. तर रस्ता करत असताना अडचणींवर मात करुन पुढे जात असताना कुनाच्या सत्कारणाची गरज नसल्याचा पलटवार बेनकेंनी केला. यावरुन दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. यावेळी कार्यक्रमस्थळी आळेफाटा पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. दुसरीकडे दोन आमदारांच्या वादात आमचा काय दोष? आमचा रस्ता कोन करणार? असा सवाल ग्रामस्थांनी केला.

“जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे कोणतेही विकास काम न करता आमदार अतुल बेनके यांनी खोटे श्रेय घेण्याचे खोटं काम केलं आहे. आमदार अतुल बनके यांनी गेल्या चार वर्षांमध्ये जुन्नर तालुक्यात एक रुपयाचेही विकास काम केले नाही. आमदार बेनके यांच्या अशा वागण्याने शिवजन्मभूमीत त्यांची लाज गेली आहे”, असा घणाघात शरद सोनवणे यांनी केली.

“जुन्नरच्या बेल्हे गावात विद्यमान आमदारांनी कोणतीही काम केलेलं नाही. पण त्या कामांचं श्रेय घेण्याचं खोटं काम त्यांनी केली. अधिकाऱ्यांनी त्यांना वेळोवेळी सांगितलं की, संबंधित काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मंजूर झालंय. मी विद्यमान आमदार असताना ते अतिशय जिकरीचं काम केलं होतं. बेल्हे गावावरुन थेट जेजुरी असा तो रस्ता मंजूर केला होता. अष्टविनायकचे रस्ते देखील देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मंजूर केले होते. त्यासाठी त्यांनी स्पेशल नीधी दिला होता”, असं शरद सोनवणे म्हणाले.

“हे गाव शिवकालीन असल्याने त्या गावात रस्ता नेत असताना थोड्या अडचणी आल्या. त्यांनी आज भूमिपूजन ठेवलं तेव्हा त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की, कोणत्याही प्रकारची मूवमेंट करु नका. खरंतर या आमदाराने गेल्या चार वर्षात कोणतही काम केलं नाही. सरकारमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र काम करत आहेत. कमीत कमी या गोष्टीचा त्यांना विसर पडता कामा नये”, असा टोला शरद सोनवणे यांनी लगावला.

‘काही लोकांनी दोन वर्षे रस्ता रखडवला’, अतुल बेनके यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार अतुल बेनके यांनीदेखील या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. “जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील रस्ता काही लोकांनी दोन वर्षे रखडवला होता. पूर्वी मंजूर झालेला तो रस्ता रद्द झाला होता. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन नव्याने त्या रस्त्याची मंजुरी केली आणि रस्ता चालू करायला गेलो होतो. तर मागील वेळेस ज्या लोकांनी रस्ता रखडविला होता ती लोक पुढं आली. बेल्हेमधील रस्त्याचं आज भूमिपूजन करायचं आणि कामाला सुरुवात करायची होती. हे ग्रामस्थांनी ठरविले होत”, अशी प्रतिक्रिया अतुल बेनके यांनी दिली.

“आज भूमिपूजन झालं. उद्यापासून कामाला सुरुवात होणार आहे. माजी आमदार शरद सोनवणे यांच्या पोटात दुखत आहे. त्यातून त्यांनी आज हे कृत्य केलं आहे. जुन्नर तालुका ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी आहे. जुन्नरच्या भूमीला असे शोभत नाही. सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की, विकास कामांना खोडा न टाकता पुढे जाण्याची भूमिका घ्यावी”, अतुल बेनके म्हणाले.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.