रेल्वेचा चार दिवसांचा मेगा ब्लॉक, अनेक एक्स्प्रेस रद्द तर काही गाड्यांचे मार्ग बदलले

रेल्वेने चार दिवसांचा मेगा ब्लॉक केला आहे. विविध विकास कामांसाठी हा बदल केला गेला आहे. यामुळे प्रवासाला जाण्यापूर्वी अपडेट माहिती घेऊन प्रवास करावा. 25 ते 30 मार्च पर्यंत रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. तसेच दौंड-मनमाड सेक्शनमध्ये काम सुरु आहे.

रेल्वेचा चार दिवसांचा मेगा ब्लॉक, अनेक एक्स्प्रेस रद्द तर काही गाड्यांचे मार्ग बदलले
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 8:27 AM

सागर सुरवसे, सोलापूर : रेल्वेची कामे अनेक ठिकाणी सुरु आहे. या कामांमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करावा लागतो. रेल्वेने सोलापूर विभागात चार दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे अनेक एक्स्प्रेस रद्द तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. यामुळे प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी अपडेट माहिती घेऊन प्रवास करावा. 25 ते 30 मार्च पर्यंत सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे.सोलापूर विभागातील काही स्टेशनदरम्यान नॉन इंटरलॉक आणि दुहेरीकरण तसेच ब्लॉकचे काम सुरु आहे, त्यामुळे हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

चार दिवस वेळापत्रक बदल

सोलापूर विभागातील काही स्टेशनदरम्यान नॉन इंटरलॉक आणि दुहेरीकरणचे काम 25 ते 30 मार्च दरम्यान होणार आहे. त्यामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. चार दिवसांचा मेगा ब्लॉक असल्यामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आलेय. 25 ते 30 मार्चपर्यंत सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यांसाठी हा बदल असणार आहे.यामुळे सोलापूर विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवास यांची गैरसोय होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

कोणत्या गाड्या रद्द

  • निजामाबाद- पुणे, नांदेड-पुणे, हडपसर-नांदेड, कोल्हापूर-गोंदिया, नागपूर-पुणे या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • बेंगलोर-न्यू दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस, हावडा-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस, पुणे-वाराणसी एक्सप्रेस, यशवंतपुर-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे.

दौंड-मनमाड सेक्शनमध्ये काम

दौंड-मनमाड सेक्शनमध्ये रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे २८ मार्च ते १ एप्रिल दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

कोणत्या गाड्या रद्द

  • २८ मार्च – कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नांदेड पुणे एक्स्प्रेस.
  • २९ मार्च- पुणे-नांदेड एक्स्प्रेस, पुणे नागपूर एक्स्प्रेस.
  • ३० मार्च- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस
  • १ एप्रिल- निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस
  • या गाड्यांचा मार्गात केला बदल
  • २७ मार्च : हावडा-पुणे व हटिया-पुणे एक्स्प्रेस ही रेल्वे नागपूर -बल्लारशाह-वाडी-सिकंदराबाद-दौंडमार्गे धावणार आहे.
  • २८ मार्च : कोल्हापूर ते हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस
  • २९ मार्च : यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस व पुणे-बनारस ही रेल्वे लोणावळा-पनवेल-कल्याण-मनमाड मार्गे धावणार आहे.
Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.