AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपकडून सुशीलकुमार शिंदे यांची कोंडी, कट्टर समर्थकाचा भाजप प्रवेश

लिंगायत बहुल असलेल्या सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील माजी राज्यमंत्री आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना पर्याय म्हणून भाजपला नवा चेहरा मिळाला आहे. मिशन २०२४ साठी भाजप या चेहऱ्याचा वापर करणार आहे. परंतु यामुुळे सुशीलकुमार शिंदे यांची अडचण झालीय.

भाजपकडून सुशीलकुमार शिंदे यांची कोंडी, कट्टर समर्थकाचा भाजप प्रवेश
| Updated on: Mar 24, 2023 | 8:23 AM
Share

सागर सुरवसे, सोलापूर : भारतीय जनता पक्षाने राज्यात मिशन २०२४ ची तयारी जोरात सुरु केली आहे. यामुळे अनेक ठिकाणी इतर पक्षातील दमदार कार्यकर्त्यांना भाजप प्रवेश दिला जात आहे. आता सोलापूर जिल्ह्यात भाजपने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना धक्का दिला आहे. शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या युवा कार्यकर्त्याला भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. यामुळे सुशीलकुमार शिंदे यांची अडचण होणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्याचा मुंबईत भाजप प्रवेश सोहळा झाला.

कोणी केला प्रवेश

सोलापुरातील दादा प्रतिष्ठानचे प्रमुख आणि युवा नेते उदयशंकर पाटील यांचा भाजपत प्रवेश झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून उदयशंकर पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत्या. भाजपचे मिशन 2024 चे प्रमुख असलेले आमदार श्रीकांत भारतीय यांनी मागील महिन्यात त्यांच्या निवासस्थानी येऊन घेतली भेट घेतली होती. त्यांनी उदयशंकर पाटील यांना भाजपमध्ये येण्यासाठी गळ घातली होती. अखेरी त्यात ते यशस्वी ठरले. उदयशंकर पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापूरच्या राजकारणातील समीकरणे बदलणार आहे.

विजयकुमार देशमुख यांना पर्याय

लिंगायत बहुल असलेल्या सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील माजी राज्यमंत्री आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना पर्याय म्हणून भाजपचा नवा चेहरा उदयशंकर पाटील ठरू शकतात.

कोण आहेत उदयशंकर पाटील

उदयशंकर पाटील हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जातात.उदय शंकर पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवक काँग्रेस पासून केली होती. युवक काँग्रेसचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.मात्र त्यानंतर अंतर्गत गटबाजीतून सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसमधून ते अलिप्त झाले.

सुशीलकुमार शिंदे यांच्यांविरोधात लढवली निवडणूक

2004 साली सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना सोलापूर दक्षिण मतदार संघातून उदयशंकर पाटील यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेविरोधात निवडणूक लढवल्याने उदयशंकर पाटील यांची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती. मात्र निवडणुकीसाठी 25 वर्ष पूर्ण नसताना खोटा दाखला बनवून शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढविल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला.

राज्यभर कार्यकर्त्यांचे जाळे

उदयशंकर पाटील यांनी आर.पी. ग्रुपच्या माध्यमातून राज्यभर कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे.सोलापूर जिल्ह्यातील लिंगायत समाजातील प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जातात.सोलापुरात दादाश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी भव्यदिव्य गणेशोत्सवाद्वारे युवकांचे संघटन बांधले आहे. कर्नाटकातील भाजपचे दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या माध्यमातून भाजपशी जवळीक साधली. त्याचबरोबर शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याशी कायम संपर्कात ते राहिले

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.