AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railways : चल बे पुना जाई बा… आता थेट बिहारमधून पुण्यासाठी स्पेशल ट्रेन, टाईम टेबलही जारी

रेल्वे प्रवाशांच्या मागणीमुळे रेल्वेने बिहार ते पुणे ही विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातंर्गत बिहारमधील जयनगर ते पुणे, दानापूर ते पुणे आणि मुझफ्फरपूर ते यशवतंपूर या दरम्यान विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. याविषयीचे वेळापत्रक पण रेल्वे अपडेट केले आहे.

Indian Railways : चल बे पुना जाई बा... आता थेट बिहारमधून पुण्यासाठी स्पेशल ट्रेन, टाईम टेबलही जारी
बिहारमधून गाठा पुणे, पुण्यातून गाठा बिहार
| Updated on: Apr 03, 2024 | 11:38 AM
Share

भारतीय रेल्वे, प्रवाशांच्या सुविधांसाठी वेळोवेळी काही जोरदार निर्णय घेते. अनेक प्रवाशांच्या मागणीनंतर रेल्वेने काही महत्वपूर्ण रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, बिहारमधील जयनगर येथून ते पुण्यापर्यंत, दानापूर येथून ते पुण्यापर्यंत आणि मुझफ्फरपूर ते यशवंतपूरपर्यंत विशेष रेल्वे धावणार आहेत. पुणे हे राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. एमआयडीसी, आयटी हब, रिअल इस्टेटमधील मोठी उलाढाल यामुळे पुण्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यात बाहेरील राज्यातील मोठा वर्ग काम करतो. त्यांना या रेल्वेने मोठी सुविधा मिळणार आहे.

या नवीन रेल्वे धावणार

  1. जयनगर-पुणे –  रेल्वे क्रमांक 055529 जयनगर ते पुणे वन वे स्पेशल ही 5 एप्रिल 2024 रोजी जयगनर येथून संध्याकाळी 5 वाजता सुटेल. ही रेल्वे दरभंगा, मुझफ्फरपूर, हाजीपूर, पाटीलपूत्र, आरा, बक्सर, पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शनसह विविध स्टेशनवर ती विसावा घेईल. 7 एप्रिल 2024 रोजी 5:35 वाजता ही रेल्वे पुणे स्टेशनवर येईल. या विशेष ट्रेनमध्ये स्लीपर क्लासचे 20 कोच असतील.
  2. दानापूर-पुणे वन वे स्पेशल ट्रेन – रेल्वे क्रमांक -03265 दानापूर-पुणे वन वे स्पेशल ट्रेन दानापूर येथून 4 एप्रिल रोजी रात्री 21.40 वाजता निघेल. आरा, बक्सर, पंडीत दीन दयाल उपाध्याय जंक्शनसह ती विविध स्टेशनवर थांबेल. 6 एप्रिल रोजी सकाळी 04.30 वाजता ही रेल्वे पुण्यात पोहचेल. या खास ट्रेनमध्ये स्लीपर क्लासचे 20 कोच असतील.
  3. बरौनी-कोइम्बतूर वनवे स्पेशल ट्रेन – रेल्वे क्रमांक -05279 बरौनी-कोइम्बतूर वन वे स्पेशल ट्रेन ही बरौनी रेल्वे स्टेशनवरुन 4 एप्रिल रोजी रात्री 23.45 वाजता निघेल. ही ट्रेन किऊल, झाझा, जसीडीह, चित्तरंजन, धनबाद, रांची येथून धावेल. 7 एप्रिल रोजी 4.00 वाजता ही रेल्वे कोइम्बतूर येथे पोहचेल. या स्वतंत्र ट्रेनमध्ये तृतीय वातानुकूलित श्रेणीचे 2, स्लीपर क्लासचे 13 आणि साधारण श्रेणीचे 3 कोच आहेत.
  4. मुझफ्फरपूर-यशवंतपूर – रेल्वे क्रमांक -05269 मुझफ्फरपूर-यशवंतपूर वन वे स्पेशल ट्रेन 4 एप्रिल रोजी मुझफ्फरपूर येथील रेल्वे स्टेशनवरुन दुपारी 15.30 रवाना होईल. ही रेल्वे हाजीपूर, पाटलीपूत्र, आरा, बक्सर, पंडीत दीन दयाल उपाध्याय जंक्शनसह इतर अनेक स्टेशनवर थांबेल. 6 एप्रिल रोजी ही रेल्वे रात्री 19.00 वाजात यशवंतपूर येथे पोहचेल. या विशेष रेल्वेत द्वितीय वातानुकूलित श्रेणीचे 1, तृतीय वातानुकूलित श्रेणीचे 3, स्लीपर क्लासचे 9 आणि साधारण श्रेणीचे 3 कोच आहेत.

Follow Us
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा