मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सकाळी सकाळी कोणाचे दर्शन; गुन्हेगारी दुनियेतील हे बेताज बादशाह किती दूर

तिहार तुरुंगात नामचीन गुंडांचा जणू मेळा आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन, दहशतवादी झियाऊर रहमान, गुंड नीरज बवाना सह इतर अनेक कैदी आहेत. तिहारच्या दोन नंबरच्या बराकीत या गुंडाना ठेवण्यात येते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहारमध्ये ठेवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सकाळी सकाळी कोणाचे दर्शन; गुन्हेगारी दुनियेतील हे बेताज बादशाह किती दूर
केजरीवाल तिहार तुरुंगात
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 10:59 AM

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री न्यायालयीन कोठडीत आहेत. ते तिहार तुरुंगात आहेत. केजरीवाल यांना तिहारच्या जेल क्रमांक 2 मध्ये ठेवण्यात आले आहे. केजरीवाल यांच्या बरॅकच्या बाजूलाच अनेक नामचीन गुंड, दहशतवाद्यांची बरॅक आहे. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन, दहशतवादी जियाऊर रहमान, गुंड नीर बवाना याच्यासह इतर अनेक गुंड आहेत.

हाय रिस्क बरॅक

तिहार तुरुंगात काही हाय रिस्क बरॅक आहेत. यामध्ये डॉन छोटा राजन हा जेल क्रमांक 2 मधील बरॅकीत आहे. हाय रिस्क वॉर्ड हा या तुरुंगाचा विशेष स्वतंत्र हिस्सा आहे. या वॉर्डतील प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग पण वेगळा आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे या हायरिस्क वॉर्डमध्ये नाहीत. तर जवळील एका बरॅकमध्ये आहेत. तसा हा भाग अति संवेदनशील वॉर्डपासून दूर आहे. केजरीवाल यांना अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

तुरुंग क्रमांक -2 मध्ये कोणते बदमाश

तुरुंग क्रमांक -2 मध्ये, जो अति संवेदनशील मानण्यात येतो, तिथे छोटा राजन, कुख्यात गँगस्टर नीरज बवाना यांना ठेवण्यात आले आहे. बवाना याच्यावर दिल्लीतील हत्येचा गुन्हा दाखल आहे. एनआयएने पण त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. याच तुरुंगात दहशतवादी जियाऊर रहमान हा आहे. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम पण याच तुरुंगात होता.

केजरीवाल यांची अटक योग्यच-ईडी

सक्तवसुली संचालनालयाने, अरविंद केजरीवाल यांची अटक योग्य असल्याचा युक्तीवाद केला आहे. तसेच केजरीवाल यांच्यावतीने दाखल केलेल्या सूटकेच्या याचिकेवर, जामीन अर्जाला विरोध केला आहे. दिल्ली हायकोर्टाने प्रकरणात ईडीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्री केजरीवाल यांची अटक ही न्यायोचीत आणि कायद्याला धरुन असल्याचा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला. प्रकरणात कोणाचा हस्तक्षेप नको असल्याचे सांगितले. पीएमएलएच्या नियम -16 आणि घटनेच्या अनुच्छेद -22 नुसार सर्व प्रक्रिया सक्तीने पूर्ण करण्यात येईल, असे ईडीने कोर्टात सांगितले.

संजय सिंह यांना जामीन, सिसोदियांचा मुक्काम वाढला

संजय सिंह यांना या प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा जामीन अर्ज राऊज एव्हेन्यू कोर्टाने फेटाळला. मनिष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल हे दोन्ही सध्या तिहार तुरुंगात आहे. कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना केजरीवाल यांना जामीन मिळण्याची आशा आहे.

येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.