Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITR Update : करदात्यांसाठी महत्वाची अपडेट, ITR फॉर्म इनेबल

मूल्यांकन वर्ष 2024-24 (Assessment Year 2024-24) साठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31जुलै 2024 ही आहे. ई-फायलिंग संकेतस्थळावर जाऊन करदाते ऑनलाईन आयकर रिटर्न दाखल करु शकतात. त्यासाठी आयटीआर फॉर्म इनेबल करण्यात आले आहेत.

ITR Update : करदात्यांसाठी महत्वाची अपडेट, ITR फॉर्म इनेबल
करदात्यांसाठी महत्वपूर्ण अपडेट
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 10:16 AM

आर्थिक वर्ष 2023-24 आणि मूल्यांकन वर्ष 2024-25 संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. करदात्यांना त्यांचा कर भरणा करता येणार आहे. या वर्षीपासून अगोदरच फॉर्म इनेबल करण्याचा पायंडा आयकर खात्याने पाडला आहे. आर्थिक वर्ष सुरु होताच हे फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  इतर अनेक सोयी-सुविधा पण वाढविल्या आहेत. त्यामुळे आयकर वेळेत भरण्यात तांत्रिक अडचण वगळता पुरेसा वेळ न मिळाल्याचे कारण देता येणार नाही. आयकराचा भरणा करण्यासाठी आयकर विभागाने आयकर रिटर्न फॉर्म 1 एप्रिल 2024 पासून इनबेल केले आहेत.

हे आहेत अर्ज

आर्थिक वर्ष 2023-24 आणि मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी आयकर खात्याने आयटीआर -1, आयटीआर – 2, आयटीआर – 4 हे फॉर्म इनेबल केले आहेत. आयकर भरण्यासाठी करदात्यांन त्याचा वापर करता येईल. प्राप्तिकर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 ही आहे.

हे सुद्धा वाचा
  1. कोणासाठी आहे ITR फॉर्म -1 – करदात्यांचे उत्पन्न 50 लाख रुपयांच्या आत असेल तर त्यांना आयकर रिटर्न फॉर्म -1 मदतीला येईल. अशा करदात्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत हा पगाराव्यतिरिक्त संपत्तीतून होणाऱ्या कमाईतून असू शकतो. याशिवाय व्याजातून होणारे उत्पन्न, लाभांश प्राप्ती, शेतीतून वार्षिक 5,000 रुपयांपर्यंतची कमाई, असे करदाते ITR फॉर्म -1 चा वापर करु शकतात.
  2. ITR फॉर्म -2 कोणासाठी-  म्युच्युअल फंड, शेअर वा स्थावर मालमत्ता विक्रीतून कमाई होत असेल, एकाहून अधिक मालमत्ता असतील. तर अशा करदात्यांना आयटीआर -2 आधारे इनकम टॅक्स रिटर्न दाखल करता येतो.
  3. आयटीआर फॉर्म- 4 कोणासाठी – आयटीआर फॉर्म- 4 हा हिंदू अविभाजीत कुटुंबांसाठी आहे. अशा करदात्यांना व्यवसाय आणि इतर माध्यमातून एकूण 50 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. कंपनीचे संचालक वा असूचीबद्ध इक्विटी शेअरमध्ये गुंतवणूक, शेती उत्पन्नातून वार्षिक 5,000 रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळवणाऱ्या करदात्यांना हा फॉर्म उपयोगी ठरतो.

आर्थिक वर्षांपासूनच श्रीगणेशा

यापूर्वी आयकर विभाग नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर एप्रिल महिन्यात इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म नोटिफाय करत होता. पण यंदा लवकरच फॉर्म नोटिफाय करण्यात आले आहेत. नवीन वर्ष सुरु होताच आयकर विभागाने ऑनलाईन आणि ऑफलाईन आयकर रिटर्न फॉर्म इनबेल केले आहेत. त्यामुळे करदात्यांना आयकर रिटर्न दाखल करता येणार आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.