AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांच्या मागणीला यश ; महाज्योतीचे उपकेंद्र पुण्यात होणार ; जाणून घ्या नेमकं कुठे?

छोट्या- मोठ्या कामांसाठी नागपूरला फेऱ्या मारणे अनेक विद्यार्थ्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळेच पुण्यात महाज्योतीचे उपकेंद्र करावे अशी मागणी विद्यार्थ्यांच्याकडून होत होती. आता पुण्यात केंद्र झाल्यामुळं विद्यार्थ्यांना नागपूरला होणार हेलपाटा वाचणारा आहे.

विद्यार्थ्यांच्या मागणीला यश ; महाज्योतीचे उपकेंद्र पुण्यात होणार ; जाणून घ्या नेमकं कुठे?
Mhajyoti
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 1:54 PM
Share

 प्राजक्ता ढेकळे , पुणे – राज्य शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांच्या(OBC Students)  सामाजिक शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी महाज्योती (Mahajyoti) या स्वायंत्त संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे उभारण्यात आले. मात्र या संस्थेचे उपकेंद्र पुण्यात व्हावे अशी मागणी विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांनी केली होती. त्यासाठी महाज्योतीचे संचालक प्रा.दिवाकर गमे (Director of Mahajyoti Prof. Divakar Game) यांच्याकडे निवेदन  देण्यात आले होते. तसेच शासन दरबारीही पाठपुरवठा करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या या मागणीला यश आले असून महाज्योतीचे उपकेंद्र पुण्यात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी येथे हे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या अडचणी होणार दूर महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्या येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी, तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थ्यांना दरवेळी नागपूरला जावे लागत होते. छोट्या- मोठ्या कामांसाठी नागपूरला फेऱ्या मारणे अनेक विद्यार्थ्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळेच पुण्यात महाज्योतीचे उपकेंद्र करावे अशी मागणी विद्यार्थ्यांच्याकडून होत होती. आता पुण्यात केंद्र झाल्यामुळं विद्यार्थ्यांना नागपूरला होणार हेलपाटा वाचणारा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारी , अडचणीची सोडवणूक पुण्यातील केंद्रातूनच होणार आहेत. विश्रांतवाडीतील सामाजिक न्याय विभागात याचे उप केंद्र सुरु होणार आहे.

आमच्या पाठपुराव्याला यश ओबीसी विद्यार्थीच्या सामाजिक,शैक्षणिक आणी आर्थिक उन्नतीसाठी राज्यशासनाने महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरु केली.त्याचे मुख्यालय नागपुरला आहे. त्याचे उपकेंद्र पुण्यात मध्ये व्हावी.यासाठी गेली कित्येक महिने प्रा.दिवाकर गमे सर (महाज्योती महासंचालक ) यांच्या बरोबर आम्ही पाठपुरावा केला होता.त्यांची दखल शासनानी घेतले. सामाजिक न्याय विभाग विश्रांतवाडी या ठिकाणी उपकेंद्रास जागा मिळाली आहे. विद्यार्थींचा येथुन पुढे नागपुरला वेगवेगळया विषयी तक्रार घेउन जाण्याचा वेळ व खर्च वाचणार असल्याची भावना स्टुडंट हेल्पींग हँड या विद्यार्थीसंघट्नेचे अध्यक्ष कुलदिप आंबेकर यांनी केली आहे.

Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…

PHOTO | ट्रकचा चेंदामेंदा, रस्त्यावर लाल चिखल! औरंगाबादमधील वैजापुरात विचित्र अपघात कसा घडला?

Video : Union Budgetनंतर युवकानं सायकलचं हे असं काय केलं? हर्ष गोयंकांचं मजेशीर ट्विट होतंय Viral

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.