Sunil Mehta : प्रकाशन व्यवसायात क्रांती करणारे सुनील मेहता काळाच्या पडद्याआड, आज पुण्यात अंत्यसंस्कार

मेहता पब्लिकेश हाऊसची (Mehta Publication House) जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या सुनील मेहता (Sunil Mehta) यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं आहे.

Sunil Mehta : प्रकाशन व्यवसायात क्रांती करणारे सुनील मेहता काळाच्या पडद्याआड, आज पुण्यात अंत्यसंस्कार
सुनील मेहता

पुणे: महाराष्ट्रातील प्रमुख प्रकाशन संस्था मेहता पब्लिकेश हाऊसची (Mehta Publication House) जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या सुनील मेहता (Sunil Mehta) यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं आहे. आज पुण्यात (Pune) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुनील मेहता गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील पूना हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होते. मात्र, अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं. आज सकाळी सुनील मेहता यांचं पार्थिव मेहता पब्लिकेशन हाऊसमध्ये सकाळी 9 ते 9.30 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर मेहता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मेहता पब्लिकेशनचे संचालक सुनील मेहता यांना किडनी स्टोनवरील उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले होते. पण, उपचारादरम्यान एकेक अवयव फेल होत गेले. अखेरच्या दोन दिवसात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

महाराष्ट्राच्या प्रकाशन व्यवसायाला नवी दिशा

सुनील मेहता यांनी महाराष्ट्रासह भारतातील प्रकाशन व्यवसायाला नवी दिशा देण्याचं काम केल. सुनील मेहता यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रकाशनासंदर्भात प्रतिनिधित्त्व केलं. 1986 मध्ये त्यांनी मेहता पब्लिकेशन हाऊसची धुरा सांभाळली होती. सुनील मेहता यांनी मेहता पब्लिकेशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय लेखकांचं साहित्य अुवादित करुन मराठीत कशा प्रकारे येईल, यासाठी प्रयत्न केले.

विविध भाषांमधील साहित्य मराठीत आणण्यासाठी प्रयत्नशील

सुनील मेहता यांनी 1986 मध्ये मेहता पब्लिकेशन हाऊसची सूत्रं मिळाल्यानंतर या संस्थेला नावलौकिक मिळवून दिला. मराठीतील नामांकित साहित्यकृतीच्या प्रकाशनासह विविध भाषांमधील साहित्य मराठी भाषेत यावं म्हणून अनुवादित साहित्याला प्राधान्य दिलं. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित लेखक जेफ्री आर्चर, मायकल क्रायटन, रॉबिन कुक, फ्रेडरिक पोरसाईथ, लिस्टर मॅक्लीन , डेबोरा एलिस, झुम्पा लाहिरी यांच्यासह अनेक साहित्यिकांचं लेखन मराठीत आणण्यासाठी सुनील मेहता यांनी प्रयत्न केले.

आज अंत्यसंस्कार

सुनील मेहता किडनीच्या आजारामुळं रुग्णालयात दाखल होते. त्यांना अखेरच्या दोन दिवसांमध्ये दोन दिवस व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलं होतं.काल 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी 9 ते 9.30 पर्यंत मेहता पब्लिशिंग हाऊसमध्ये सुनील मेहता यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

इतर बातम्या:

सिंधुदुर्गसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, जिल्हा बँकेच्या अध्यक्षाची निवड; नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी

Video : फाळणीनं तोडलं… नियतीनं जोडलं! 74 वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या भावांची गळाभेट म्हणूनच ऐतिहासिक आहे

 

Sunil Mehta director of Mehta Publication House died funeral done today at Pune

Published On - 7:42 am, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI