Supriya Sule: ते काही तरी नवनवीन… रोहित पवारांवर अर्बन नक्षलवादाचा आरोप… सुप्रिया सुळेंचे भाजपला सणसणीत उत्तर
Supriya Sule on Rohit Pawar : गांधी जयंती शांततेच्या मार्गाने प्रत्येक कुटुंब स्वतंत्र रहावे श्वास घ्यावा, दुर्दैवी हत्या झाली,त्याचे संस्कार त्याचा विचार भारत पुढे नेण्याची जबाबदारी आहे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनावरही त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.

आमदार रोहित पवार यांनी दुष्काळ आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगा प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात आंदोलनाची लड लावली आहे. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यातच काल त्यांनी पुण्यातील एमपीएससी आंदोलनातील विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर भाजपच्या गोटातून त्यांच्यावर जहरी टीका करण्यात आली. ते अर्बन नक्षलवादाला चालना देत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात मोठी प्रतिक्रिया दिली.
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देणार
मी एमपीएससी आंदोलन आता भेट देणार आहे. त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. त्यांचे वय नाही हो आंदोलन करण्याचे. विशेष तीन दिवसाचे चर्चासत्र आंदोलन शेतकर्यांसाठी आणि विद्यार्थी साठी घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. राज्यात सारखी आंदोलनं का होतात याचे सरकारने आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. सातत्याने राज्यात आंदोलनं का सुरू आहेत, याचा विचार सरकारने करावा, अशी बोचरी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
त्या आरोपावरून भाजपला सणसणीत टोला
काल एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यात तोडगा निघाला होता. पण आमदार रोहित पवार पुन्हा या विद्यार्थ्यांना जाऊन भेटले आणि आंदोलनासाठी तयार झाले. रोहित पवार यांच्यावर अर्बन नक्षल तयार करत असल्याच्या आरोपावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
कसं आहे भारतीय जनता पार्टीत आमचे काही मित्र आहेत. ते काही तरी नवीन नवीन शब्द काढत असतात. असं काही नसतं. या विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्यांच्या मेरिटवर न्याय मागत आहेत. 200 आमदार असलेल्या सरकारला मुलांशी चर्चा करायला काय हरकत आहे. एक टप्पा पुढे गेले पाहिजे. लोकशाहीत चर्चा तर झाली पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाले. पत्रकारांना मारहाण म्हणून चुकीचा आहे ज्यांनी कुणी कुणाला मारहाण केली ते अयोग्य आहे, असेही त्या म्हणाल्या.
पुणे पोलिसांवर कडक टीका
पुणे पोलिसांनी यंत्रणे मागे जी सत्य आहे त्याबद्दल माझं मत मी कधीच लपवून ठेवलेला नाही, पुण्यात कुणी वाढतात कोणता गॅंग महिला अत्याचार हा डेटा पुन्हा पुन्हा सांगत आहे हा डेटा माझा नाही. हो मंत्रालयातील डेटा सांगतो की राज्यातील एक नंबरचा गुण्या असलेले शहर आहे. अशा परिस्थितीत महिला अत्याचार सर्वसामान्य जनता आज पत्रकारावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळत नाही यात काही आश्चर्य वाटत नाही. पुण्याची पोलिसांना समाधान कारक काम करते असे प्रश्न विचारला तर नाही म्हणून सांगते, अशी कडक टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.