..तर माझा मुलगा वाचला असता, स्वप्नीलची आई भावूक; विद्यार्थ्यांनी वेगळा विचार करु नये, सुप्रिया सुळेंचं आवाहन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) अभियांत्रिकी सेवेची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत न झाल्यानं नोकरी न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) याच्या कुटुंबीयांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली.

..तर माझा मुलगा वाचला असता, स्वप्नीलची आई भावूक; विद्यार्थ्यांनी वेगळा विचार करु नये, सुप्रिया सुळेंचं आवाहन
सुप्रिया सुळे यांच्याकडून स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांचं सांत्वन
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 1:53 PM

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) अभियांत्रिकी सेवेची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत न झाल्यानं नोकरी न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) याच्या कुटुंबीयांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. सुप्रिया सुळे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबीयांचं सांत्वन करत त्याच्या बहिणीच्या शिक्षण आणि नोकरीची हमी घेतली. स्वप्नील लोणकर याची आई यावेळी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. (Supriya Sule meet Swapnil Lonkar Family at kedgaon of Daund Swapnil Mother emotional)

स्वप्निल लोणकर यानं 29 जून रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनात दिसून आले. भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC परीक्षेच्या मुद्यावरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या दौंड तालुक्यातील केडगाव या ठिकाणी स्वप्निलच्या आई वडिलांची भेट घेतली.

तर माझा मुलगा वाचला असता

सुप्रिया सुळेंनी लोणकर कुटुंबीयांची भेट घेतली त्यावेळी स्वप्निलच्या आई भावुक झाल्या. आठ दिवसांपूर्वी निर्णय झाला असता तर माझा मुलगा वाचला असता, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. माझ्या मुलाने अनेकांना प्लाझमा दिला. अनेकांचे जीव त्यानं वाचविले मात्र तो वाचू शकला नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

स्वप्नीलच्या कुटुंबाचे सांत्वन करताना सुळे यांनी स्वप्निलच्या कुटुंबाचे सर्वस्वी जबाबदारी घेण्याची हमी दिली. स्वप्निलच्या बहिणीला एक मोबाईल देखील भेट देण्यात आला. सुप्रिया सुळेंनी यावेळी स्वप्नीलच्या कुटुंबावर असलेल्या कर्जाची माहिती घेऊन पूर्ण निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थ्यांनी वेगळा विचार करु नये

खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी माध्यामांशी बोलताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांनी कोणताही वेगळा निर्णय घेऊ नये, सरकरार त्यांच्या पाठिशी असून चर्चा केली तर मार्ग करु शकतो. खासदार म्हणून मी तुमच्या सोबत चर्चा करायला तयार आहे. पण विद्यार्थ्यांनी कसलाही वेगळा विचार करु नये, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केला.

संबंधित बातम्या:

VIDEO | मास्क न लावल्याने बाचाबाची, वर्ध्यात उदय सामंतांसमोरच शिवसैनिक आपापसात भिडले

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं पुढचं पाऊल, नाशिक सहकारी साखर कारखाना चालवण्याचा ठराव, महाराष्ट्रातील पहिला प्रयोग

(Supriya Sule meet Swapnil Lonkar Family at kedgaon of Daund Swapnil Mother emotional)

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.