AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray | ‘डीजेचा नातवाला त्रास झाला, म्हणून लगेच चर्चा’, राज ठाकरेंवर महिला नेत्याचा निशाणा

Raj Thackeray | राज ठाकरे यांनी त्यांच्या X वरील पोस्टमध्ये काय लिहिलेलं?. दुपारी उठून कस चालेल अशी खोचक टिका सुद्धा या महिला नेत्याने केली. राज ठाकरे यांनी डीजे, डॉल्बीच्या दणदणाटावर बोट ठेवलय.

Raj Thackeray | 'डीजेचा नातवाला त्रास झाला, म्हणून लगेच चर्चा', राज ठाकरेंवर महिला नेत्याचा निशाणा
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 04, 2023 | 1:17 PM
Share

मुंबई (प्रदीप कापसे) : नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात गणेशोत्सव पार पडला. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरवणुकांमधील डीजे,डॉल्बीच्या दणदणाटावर बोट ठेवलं. त्यांनी X वर एक पोस्ट लिहून गणेशोत्सव मिरवणुकीतील डीजे, डॉल्बीच्या दणदणाटावर भाष्य केलं. डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टिममुळे काय दुष्परिणाम होतात, त्याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं. “डीजे,डॉल्बी ह्यांच्या आवाजच्या कर्कश्श पातळीमुळे हृदय बंद पडणं आणि मृत्यू येणं, किंवा तात्कालिक किंवा कायमचं बहिरेपण येणं, किंवा गेले काही वर्ष तर मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं हे प्रकार वाढले आहेत. मिरवणुकीत येऊन, नाचून, आनंद व्यक्त करून लोकं निघून जातात पण पोलीस असतील किंवा इतर प्रशासकीय यंत्रणांमधील लोकं असतील, त्या भागात राहणारे स्थानिक रहिवासी असतील त्यांची अवस्था खरंच गंभीर आहे. सलग २४,२४ तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या आनंदाची, उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत ही मोठी नाही का ?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

“एका बाजूला कौटुंबिक गणेशोत्सवात तो पर्यावरण पूरक असेल, थर्माकोलचा वापर टाळत, कृत्रिम तलावात विसर्जन करत, आपल्या आनंदामुळे निसर्गाची किंवा इतर कोणाची हानी होऊ नये हे पाहण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. आणि दुसरीकडे जेंव्हा त्याचं सार्वजनिक स्वरूप येतं तेंव्हा त्यातल्या वर उल्लेखलेल्या त्रुटी दुर्लक्षित करता येत नाहीत. ह्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी, सरकारने, समाजातील विचारवंतांनी आणि अर्थात गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन ह्याला काहीसं बीभत्स स्वरूप येतंय ते वेळीच थांबवलं पाहिजे” असं राज ठाकरे म्हणाले. “मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार आहेच. पण एकूण सरकारने आणि राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्यावर विचार आणि कृती करायला हवी” असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. दुपारी उठून कस चालेल?

ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी आता याच मुद्यावरुन नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केलीय. “एका मोठ्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक चालली. त्याच्या डीजेचा नातवाला त्रास झाला म्हणून लगेच चर्चा. मात्र अनेक वर्ष लेझरमुळे अनेक जणांची दृष्टी जाते तेव्हा काय होतं? नेत्यांच्या नातवाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मात्र सर्वसामान्यांची मुलही चांगली राहिली पाहिजेत” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलय, दुपारी उठून कस चालेल अशी खोचक टिका सुद्धा त्यांनी केली.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी