AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भीषण अपघातानं पुणे हादरलं, मद्यधुंद कार चालकाने 12 जणांना उडवलं, सर्वजण एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे, भीषण अपघात झाला आहे, कारचालकानं बारा जणांना उडवलं आहे. हे बाराही जण एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी! भीषण अपघातानं पुणे हादरलं, मद्यधुंद कार चालकाने 12 जणांना उडवलं, सर्वजण एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 31, 2025 | 9:14 PM
Share

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे, भीषण अपघात झाला आहे, कार चालकानं बारा जणांना उडवलं आहे. हे बाराही जण एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेतील जखमींना पुण्यातील संचेती व मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील भावे हायस्कूल जवळ हा अपघात घडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा कारचालक मद्यधुंद अवस्थेमध्ये होता.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील भावे हायस्कूल जवळ हा भीषण अपघात घडला आहे. भावे हायस्कूल जवळ एक चहाचं दुकान आहे, या दुकानाजवळ दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा अपघात घडाला आहे. कार चालकानं बारा जणांना उडवलं आहे,  ज्यांचा अपघात झाला ते सर्व एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे, या घटनेतील काही जखमींना स्थानिकांच्या मदतीनं संचेती तर काही जणांना मोडक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जेव्हा अपघात घडला तेव्हा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे.

कारवरील नियंत्रण सुटून अपघात 

हा अपघात नेमका कसा घडला? याबाबतची नेमकी माहिती समोर आलेली नाहीये, मात्र मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जेव्हा अपघात घडला तेव्हा या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये होता, त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटून वाहनाच्या अ‍ॅक्सिलेटरवर दाब पडला, त्यामुळे कारचं स्पीड अचानक वाढलं, अनियंत्रित झालेल्या कारने या चहाच्या दुकानसमोर पार्क केलेल्या गाड्या आणि तिथे असलेल्या लोकांना धडक दिली. या अपघातामध्ये एकूण बारा जण जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान या घटनेनंतर आरोपी चालक जयराम मुळे वय 27, बिबवेवाडी, या वाहनाचा मालक दिंगबर यादव शिंदे वय 27 आणि सहप्रवासी राहुल गोसावी वय 27 यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अपघातामध्ये कोणाचाही मृत्यू झाल्याचं वृत्त नाहीये.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.