AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TET exam scam | पैसे दिलेल्या अपात्र उमेदवारांनो साक्षीदार व्हा अन्यथा .. पुणे सायबर पोलिसांनी केलं आवाहन

याबरोबरच या परीक्षेत दलालांना पैसे देवून पात्र झालेल्या बनावट उमेदवारांची यादीही पोलिसांनी तयार केली आहे. पोलिसांनी जवळपास टीईटीच्या दोन्ही परिक्षांमध्ये 9,300 अपात्र उमेदवारांनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे उघड केलं आहे. त्यामुळे या पैसे दिलेल्या अपात्र उमेदवारांनी स्वतःहून पुढे यावे.

TET exam scam | पैसे दिलेल्या अपात्र उमेदवारांनो  साक्षीदार व्हा अन्यथा .. पुणे सायबर पोलिसांनी केलं आवाहन
pune-police
| Updated on: Feb 24, 2022 | 10:12 AM
Share

पुणे – महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील (TET Exam Scam )आरोपींची पुणे सायबर(cyber crime ) पोलिसांचे (police)धरपकड करण्याचे काम आहे. या घोटाळ्यातील अनेक मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबरोबरच या परीक्षेत दलालांना पैसे देवून पात्र झालेल्या बनावट उमेदवारांची यादीही पोलिसांनी तयार केली आहे. पोलिसांनी जवळपास टीईटीच्या दोन्ही परिक्षांमध्ये 9,300 अपात्र उमेदवारांनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे उघड केलं आहे. त्यामुळे या पैसे दिलेल्या अपात्र उमेदवारांनी स्वतःहून पुढे यावे. या प्रकरणाचा साक्षीदार होत तपासात सहकार्य करावे व्हावे . अन्यथा पोलिसांनी नावे उघड केल्यानंतर या अपात्र उमेदवारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे. घोटाळ्यातील पैसे देत निवड झालेल्या अपात्र उमेदवारांची यादी सायबर पोलिसांनी शिक्षण विभागाकडे सादर केली असून शिक्षण विभागाने यादीची पडताळणी केली आहे.

पोलिसांनी प्रश्नपत्रिकांची केली पडताळणी

टीईटीमधील घोटाळा उघड झाल्यानंतर पोलिसांनी अपात्र उमेदवारा शोधून काढण्यासाठी दलालांकडून माहिती मिळवलीच. पण याचबरोबर पोलिसांनी तब्बल साडेतीन लाख प्रश्‍नपत्रिकांची पडताळणी केली आहे. ओएमआर शीटमध्ये काही ठरवून दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यात आलेली नाहीत. पात्र उमेदवारांच्या यादीत अपात्र उमेदवारांचे नावे समाविष्ट करण्यात आलेली असल्याचे उघडकीस आले आहे. त्याटच अनेक अपात्र उमेदवारांनी गैरमार्गाचा वापर केल्याचे समोर आले.

परराज्यात घोटाळ्याची पाळेमुळे

या घोटाळ्यातील अनेक आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशीही सुरु आहे त्यातूना दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. चौकशी दरम्यान एका आरोपी या घोटाळ्याची पाळंमुळं बिहार पाटण्यापर्यंत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या काही तास प्रश्‍नपत्रिका सर्व्हरवर डाऊनलोड करतात. गैरप्रकार करणारे सर्व्हरच्या गोपनीय क्रमांकात (प्रोगामिंग कोड) छेडछाड करून प्रश्‍नपत्रिका फोडतात. परीक्षा केंद्रावरील संगणकात छेडछाड करून गैरप्रकार केले जातात. असे तपासादरम्यान समोर आले आहे.

Nagpur | नाग नदी केव्हा स्वच्छ होणार? पुन्हा एकदा बदलला डीपीआर, प्रदूषणावर उपाय काय?

दारुची बाटली द्या, नाही तर खालीच येणार नाही, औरंगाबादेत दारूड्याचा टॉवरवरूनच धिंगाणा, अखेर…

Good News : केळीचा गोडवा वाढला, व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचला

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...