omicron alert| लहान मुलांना ओमिक्रॉनचा सर्वात जास्त धोका ; नियम न पाळल्यास लॉकडाऊन करावे लागणार – डॉ. अविनाश भोंडवे

येत्या दोन आठवड्यात ओमिक्रॉनचा विषाणू मुळे नेमका किती धोका आहे. याची माहिती मिळेल. तोपर्यंत आपल्याकडची गर्दी आटोक्यात आहे असे वाटले ठीक नाही तर कदाचित लॉकडाऊन करावे लागेल.

omicron alert| लहान मुलांना ओमिक्रॉनचा सर्वात जास्त धोका ; नियम न पाळल्यास लॉकडाऊन करावे लागणार - डॉ. अविनाश भोंडवे
Dr, avinash bhondve

पुणे – दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या माहितीनुसार तिथे शंभराहू अधिक रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये दोन ते पाच ,किंवा पाच वर्षांखालील मुलांची रुग्ण संख्या अधिक आहे. तर 60 वर्षे वयोगटातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर सर्वाधिक त्रास हा लहान मुलांना होत आहे. यामुळे ओमिक्रॉनची बाधा लहान मुलांना अधिक आहे. यातही ज्या मुलांना ओमिक्रॉनसंसर्ग जास्त झाला आहे.

ज्या मुलांच्या पालकांनी लस घेतली नाही. त्या लहान मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे ओमिक्रॉनबाबत महाराष्ट्रात काळजी घेता असताना 2 ते18  वर्षे वयोगटातील मुलाचे लसीकरण करणे आवश्यक आहे. तसेच जी मुले शाळेत जाणार आहेत त्यांच्या आईवडिलांनीही कटाक्षाने लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याची

14  दिवसांचे क्वारंटाईन आवश्यक आज महाराष्ट्रात गेल्या पंधरा दिवसात दोन ते अडीच हजार ;प्रवाशी येऊन गेले. त्यातील कित्येक प्रवाश्यांचा तपास लागत नाही. यामध्ये अनेक जन पॉझिटिव्ह असण्याची दाट शक्यता आहे. हीच गोष्ट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही तेच घडले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाश्यांचे आरटीपीसार टेस्ट करूनच प्रवास करावा. तसेच इथे आल्यानंतरही विमानातळावर त्याची आरटीपीसार टेस्ट करून , त्यांना 14 दिवसांचे बंधनकारक क्वारंटाईन करण्याची आवश्यकता आहे. जेणे करून या कालावधीतच ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे की नाही . हे लक्षात येईल.

… तर लॉकडाऊन करावे लागणार ओमिक्रॉनचा पसार खूप वेगाने होत आहे. डेल्टापेक्षा पाचपट वेगाने तो पसरत असल्याचे संशोधक सांगत आहेत. आता त्याची लक्षणे सौम्य आहेत. मृत्यू झालेला नाही. परंतु जेव्हा ६० च्यापुढच्या वयोवृद्ध नागरिकांना जेव्हा याची लागण होईल तेव्हा मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी खबरदारी म्हणजे नागरिकांनी कंपल्सरी मास्कचा वापर केला पाहिजे तसेच सोशल डिस्टसन्सचे पालन करणे आवश्यक आहे.याबरोबर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. मात्र अनेक लोक नियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळ येत्या गर्दी कमी करण्यासाठी लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे.

येत्या दोन आठवड्यात ओमिक्रॉनचा विषाणू मुळे नेमका किती धोका आहे. याची माहिती मिळेल. तोपर्यंत आपल्याकडची गर्दी आटोक्यात आहे असे वाटले ठीक नाही तर कदाचित लॉकडाऊन करावे लागेल.

Breaking : माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड अडचणीत, पिचड आणि कुटुंबियांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप!

mehbooba mufti : मोदी सरकारला गोडसेचा काश्मीर बनवायचा आहे, मेहबुबा मुफ्तींचा निशाणा

IND vs NZ : अवघ्या 62 धावांत न्यूझीलंडचा खुर्दा, पाहुण्यांच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

Published On - 5:17 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI