पिंपरी चिंचवडमध्ये वाहन खरेदी 37 टक्क्यांनी घटली! कोरोना, इंधन दरवाढीचा परिणाम?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 31, 2021 | 11:46 AM

गेल्या वर्षापासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाहन खरेदी (Vehicle Purchase) करण्याचं प्रमाण घटलं आहे. गेल्यावर्षी सरासरीच्या तुलनेत 37 टक्के वाहनांची विक्री कमी झाली आहे. यामागे कोरोना आणि सातत्याने वाढत जाणारे इंधनाचे दर ही कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये वाहन खरेदी 37 टक्क्यांनी घटली! कोरोना, इंधन दरवाढीचा परिणाम?
फायद्याची बातमी ! कार खरेदीचा विचार करताय का? मग या ऑफर्स जाणून घ्याच

Follow us on

पिंपरी : पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) ही शहरं गेल्या काही वर्षांत आयटी (IT) आणि औद्योगिक नगरी म्हणून उदयास आली आहेत. मोठ्या प्रमाणात झालेलं शहरीकरण आणि स्थलांतरितांची संख्या यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड वाढत आहे. यासोबतच सर्वाधिक दुचाकींची संख्या असलेलं शहर म्हणूनही पुण्याची ख्याती आहे. मात्र, गेल्या वर्षापासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाहन खरेदी (Vehicle Purchase) करण्याचं प्रमाण घटलं आहे. गेल्यावर्षी सरासरीच्या तुलनेत 37 टक्के वाहनांची विक्री कमी झाली आहे. यामागे कोरोना आणि सातत्याने वाढत जाणारे इंधनाचे दर ही कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. (The number of vehicle purchases in Pimpri Chinchwad has come down)

दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट

पिंपरी चिंचवडमध्ये 2019-20 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-21 मध्ये वाहनांच्या नोंदींची संख्या घटली आहे. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा 37 टक्के वाहनांच्या नोंदी कमी झाल्या आहेत. दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. तर तीन चाकी, ट्रक, बस यांसारख्या व्यावसायिक वाहनांच्या नोंदीही कमी झाल्या आहेत.

एका वर्षात ई-स्कूटरची संख्या 45 टक्क्यांनी वाढली

एकीकडे वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे आणि कोरोनाच्या कारणामुळे वाहनांच्या विक्रीची संख्या घटली असली तरी दुसरीकडे इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांकडे नागरिकांचा ओढा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. ई स्कूटरसारख्या इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. एका वर्षात ई-स्कूटरची संख्या तब्बल 45 टक्क्यांनी वाढली आहे.

प्रदूषणविरहित इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या संख्येतही वाढ

पिंपरी चिंचवडमध्ये डिझेलवरची 5 हजार 767 वाहनं आहेत. तर पेट्रोल वाहनांची संख्या ही 3 लाख 4 हजार 882 वर गेली आहे. त्यापाठोपाठ सीएनजी आणि एलपीजीसारख्या प्रदूषणविरहित इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या संख्येतही वाढ होत आहे. शहरात आतापर्यंत 42 हजार 215 सीएनजी आणि एलपीजी वाहनांच्या नोंदी झाल्या आहेत. यामध्ये नऊ हजार 715 चारचाकी आणि दोन हजार 148 तीनचाकी वाहनाचा समावेश आहे. यापैकी 11 हजार 903 वाहनं गेल्यावर्षी वाढली आहेत.

पुण्यात 3 लाख वाहनं भंगारात निघणार

पुणे आरटीओकडे (Pune RTO) असणाऱ्या नोंदीप्रमाणे पंधरा वर्षांवरच्या जुन्या खासगी वाहनांचीो संख्या 2 लाख 60 हजारांच्या जवळ आहे. तर 10 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वाहनांची संख्या 40 हजारांच्या घरात आहे. ही वाहनं स्क्रॅपेज पॉलिसीनुसार भंगारात जाऊ शकतात. वाहन भंगारात दिल्यानंतर वाहनधारकांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. त्याचा फायदा त्यांना नवीन वाहन घेताना होणार आहे. या प्रमाणपत्रामुळे नवीन वाहनाच्या किमतीत 15 ते 25 टक्के सवलत मिळू शकणार आहे.

पॉलिसीचे कार मालकाला काय फायदे?

वाहनधारकांना जुने वाहन स्क्रॅप केल्यावर प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र दाखवून नवीन वाहन खरेदीवर 5 टक्के सूट मिळणार आहे. वाहन कंपन्या ही सवलत देतील. शिवाय नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही. नवीन वैयक्तिक वाहन खरेदीवर रोड टॅक्समध्ये 25% सूट मिळेल. जे व्यावसायिक वाहने खरेदी करतात त्यांना रोड टॅक्समध्ये 15% सूट मिळेल.

इतर बातम्या :

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर, ‘या’ गोष्टींवर निर्बंध

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी मुदतवाढ, आज संध्याकाळपर्यंत घेऊ शकणार प्रवेश, वाचा सविस्तर

पुणेकरांसाठी मोठी बातमी! गुरूवारी शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI