Pune crime : अश्लील फोटो व्हायरल करून महिलेची बदनामी; पती-पत्नीवर बारामती पोलिसांनी दाखल केला गुन्हा

| Updated on: May 13, 2022 | 5:08 PM

महिला नंतर तिच्या पतीसह इतर ठिकाणी कामासाठी गेली. मात्र त्या महिलेने आपल्याकडेच कामाला यायला हवे नाहीतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत देवीलाल व त्याच्या पत्नीने महिलेचा पती व इतर नातेवाईकांना हे फोटो पाठवले.

Pune crime : अश्लील फोटो व्हायरल करून महिलेची बदनामी; पती-पत्नीवर बारामती पोलिसांनी दाखल केला गुन्हा
उल्हासनगरमध्ये विधेवर कात्रीने केला हल्ला
Image Credit source: tv9
Follow us on

बारामती, पुणे : महिलेची अश्लील छायाचित्रे पाठवून दिली बदनामी (Defamation) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बारामतीत ही घटना घडली आहे. कामाला असलेल्या महिलेची अश्लील छायाचित्रे पतीसह नातेवाईकांना पाठवून ही बदनामी करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी (Baramati Police) देवीलाला पेमाराम कुमावत व पायल देवीलाल कुमावत या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका चोवीस वर्षीय महिलेने या बाबत फिर्याद दिली आहे. प्रगतीनगरमध्ये राहणारी ही महिला जून 2021पासून तिच्या पतीसमवेत देवीलाल याच्याकडे मजूर (Labour) म्हणून काम करत होती. तिचे व देवीलाल यांचे सूत जुळल्यानंतर त्यांच्यामध्ये चॅटिंग सुरू झाले. व्हिडिओ कॉलवर देवीलाल याने तिचे नको त्या अवस्थेतील प्रसंगाचे स्क्रीन शॉट करून ठेवले होते.

महिलेची शहर पोलिसांत धाव

महिला नंतर तिच्या पतीसह इतर ठिकाणी कामासाठी गेली. मात्र त्या महिलेने आपल्याकडेच कामाला यायला हवे नाहीतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत देवीलाल व त्याच्या पत्नीने महिलेचा पती व इतर नातेवाईकांना हे फोटो पाठवले. तिची बदनामी केल्यानंतर त्या महिलेने शहर पोलिसात धाव घेत देवीलाल याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून देवीलाल व त्याची पत्नी पायल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती तंत्रज्ञान कायदा कलमानुसार गुन्हा दाखल

देवीलाल व त्याची पत्नी पायल या दोघांविरोधात पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अक्ट 2000 कलम 67 व भादंवि कलम 506प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांचा मोबाइल जप्त करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

‘अश्लील फोटो, मॅसेज व्हायरल करू नयेत’

सोशल मीडियावर अश्‍लील फोटोग्राफ प्रकाशित करणे, फॉरवर्ड करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अश्लील फोटो, मॅसेज व्हायरल करू नयेत. तसे केल्यास तक्रारी प्राप्त झाल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक बारामती शहर, स.पो.नि. प्रकाश वाघमारे, पोलीस नाईक जाधव अधिक तपास करीत आहेत.