AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat : पुणेकरांना मिळणार वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सवलत, कारण…

Vande Bharat Express : वंदे भारत एक्प्रेस पुणे येथून सध्या सोलापूरसाठी जात आहे. तसेच या ट्रेनने मुंबईतसुद्धा पुणेकरांना येता येते. आता पुणेकरांना या गाडीसंदर्भात चांगली बातमी मिळाली आहे. या गाडीच्या तिकीट दर कमी होणार आहे.

Vande Bharat : पुणेकरांना मिळणार वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सवलत, कारण...
Updated on: Jul 14, 2023 | 11:40 AM
Share

पुणे, दिनांक 14 जुलै 2023 : देशभरातील 24 राज्यात आलिशान वंदेभारत एक्स्प्रेस सुरु झाल्या आहेत. देशभरात वंदेभारत 26 ठिकाणांहून सुरु झाल्या आहे. महाराष्ट्रातून एकूण चार ठिकाणांवरुन वंदेभारत एक्स्प्रेस सुरु आहेत. त्यात मुंबई ते गोवा एक्स्प्रेस नुकतीच सुरु झाली. त्यापूर्वी मुंबई गांधीनगर, मुंबई सोलापूर अन् मुंबई शिर्डी या गाड्या सुरु होत्या. दिल्ली ते वाराणसी या मार्गावर 15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिली वंदेभारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. परंतु आता पुणेकरांना वंदे भारत एक्स्प्रेससाठी केलेल्या नियमाचा फायदा होणार आहे.

काय आहे नियम

वंदेभारत एक्स्प्रेसला काही मार्गावर भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. तर काही मार्गांवर प्रवासी मिळत नाही. यामुळे रेल्वे विभागाने ५० टक्के पेक्षा कमी प्रतिसाद मिळणाऱ्या ठिकाणांवरुन २५ टक्के भाडे कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमाचा फायदा पुणेकरांना होणार आहे.

का होणार पुणेकरांना फायदा

पुणेवरुन कोठेही सरळ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु नाही. परंतु मुंबई-सोलापूर वंदे भारत पुण्यावरुन जाते. या गाडीला सोलापूर ते पुणेसाठी 20 टक्केच प्रतिसाद आहे. पुणे ते सोलापूर 14 टक्के तर सोलापूर ते मुंबईसाठी 28 टक्के प्रतिसाद आहे. पुणे ते मुंबईसाठी 50 टक्के तर मुंबई ते पुणे प्रवाशासाठी 55 टक्के प्रतिसाद आहे. मुंबई ते सोलापूर मार्गावर 21 टक्के प्रतिसाद आहे. यामुळे पुणे ते सोलापूर अन् सोलापूर ते पुणे या मार्गावरील तिकीट दर 25 टक्के कमी होणार आहे. पुणेकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस 10 फेब्रवारीपासून सुरु झाली होती. त्यानंतर आता या रेल्वेच्या तिकीट दरात कपात होणार आहे.

देशात या ठिकाणी कमी प्रतिसाद

इंदूर-भोपाळ वंदे भारतला सर्वात कमी प्रतिसाद आहे. इंदूर भोपळ हे अंतर फक्त तीन तासात कापले जाते. या ठिकाणी वंदे भारत एक्स्प्रेसला जूनमध्ये केवळ 29 टक्के प्रवासी मिळाले. तसेच भोपळ ते इंदूर मार्गावर 21 टक्के प्रवासी मिळाले.

मेक इन इंडिया ट्रेन

वंदे भारत ट्रेन ही नव्या युगाची रेल्वे गाडी आहे. तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार केली आहे. या गाडीची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. वेग अन् आरामदायी प्रवासामुळे अनेक मार्गांवर तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु काही ठिकाणी तिकीट दर जास्त असल्यामुळे तिला प्रतिसाद कमी मिळत आहे. त्यामुळेच दर कपातीचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहेच.

मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा.
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?.
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी.
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन.
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट.
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही....
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही.....
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात.
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन.
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात.