Metro work |लकडी पुलावरील मेट्रोच्या कामामुळे वाहतूकीत बदल ; वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा करा वापर ; जाणून घ्या मार्ग

Metro work |लकडी पुलावरील मेट्रोच्या कामामुळे वाहतूकीत बदल ; वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा करा वापर ; जाणून घ्या मार्ग
सांकेतिक फोटो

शहरातीला पाच गणेश मंडळांनी समजुतीची भूमिका घेत मेट्रो मार्गिकेच्या कामाला विरोध नसल्याची भूमिका घेतली. तसे पत्रकही त्यांनी प्रसिद्ध केले. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात मेट्रो मार्गिकेच्या कामाला सुरुवात झाली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Dec 24, 2021 | 4:36 PM

पुणे –  शहरातील गणेश मंडळाच्या अवास्तव मागण्यांमुळे छत्रपती संभाजी महाराज पुलादरम्यान (लकडी पुल) रखडलेले मेट्रो प्रकल्पाचे काम पुन्हा एकदा सुरु झाले आहे. वनाज ते जिल्हा न्यायालयादरम्यान मेट्रोच्या कामासाठी लकडी पुलावर पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. येत्या 28 डिसेंबर पर्यंत हे काम चालणार आहे. या कामामुळे लाकडी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. रात्री 11 ते सकाळी6  वाजेदरम्यान पुलावरील सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

वाहतुकीला टिळक रोडकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग

खंडोजीबाबा चौक, कर्वे रोडने शेलारमामा चौक, यशवंतराव चव्हाण चौक, रसशाळा चौक, एस एम जोशी पुल, गांजवे चौक, डावीकडे वळून टिळक चौक किंवा उजवीकडे वळून शास्त्री रोडने दांडेकर पुलमार्गे इच्छित स्थळी जावे.

खंडोजीबाबा चौकाकडे जाण्याकरीता पर्यायी मार्ग

टिळक चौक, केळकर रोड, कासट कॉर्नर, माती गणपती चौक, नारायण पेठ पोलीस चौकी, केसरीवाडा, रमणबाग शाळा चौक, डावीकडे वळून वर्तक बाग, कॉसमॉस बँक चौक, बालगंधर्व पुलावरुन डावीकडे वळून जंगली महाराज रोडने खंडुजीबाबा चौक. तसेच केळकर रोडवरुन नदीपात्रातील रोडने ओंकारेश्वर मंदिरमार्गेही वाहनचालक जाऊ शकतात. यशवंतराव चव्हाण पुलावरुन फक्त दुचाकी वाहने ये जा करुन शकतात.

गणेश मंडळांची समजुतीची भूमिका गणेशोत्सवात देखाव्यांना अडथळा निर्माण होईल, म्हणून मेट्रोच्या खांबांची उंची वाढवावी अशी मागणी गणेश मंडळानी केली होती. मात्र अश्या प्रकारे उंची वाढवणे शक्य नसल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले. त्यानंतर शहरातीला पाच गणेश मंडळांनी समजुतीची भूमिका घेत मेट्रो मार्गिकेच्या कामाला विरोध नसल्याची भूमिका घेतली. तसे पत्रकही त्यांनी प्रसिद्ध केले. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात मेट्रो मार्गिकेच्या कामाला सुरुवात झाली.

मेट्रो मार्गिकेतील खांबांच्या उंची वाढवण्यासाठी काही गणेश मंडळानी मेट्रोचे काम बंद पडले होते. मात्र मेट्रचे काम पुन्हा पोलीस बंदोबस्तात सुरु करण्याचे आदेश उपमुख्य मंत्री व जिल्हा पालक मंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार हे मेट्रोचे काम सुरु करण्यात आले.

अवघ्या 32000 रुपयांत घरी न्या Bajaj Discover 150F बाईक, मुंबईत शानदार डील उपलब्ध

Natural Farming : आता सेंद्रिय शेतीला गती देण्यासाठी कृषी विद्यापीठांचाही सहभाग, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Aurangabad Water: वाळूजच्या जलकुंभाचे बांधकाम लवकरच सुरु होणार, पाणी साठवणुकीचा प्रश्न सुटण्याचे संकेत!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें