AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: मोठी बातमी! गणेशोत्सवाआधी तुकाराम मुंढेंचा पुण्यात दणका; बुधवार पेठेतून पनीर-खव्याने भरलेले 4 ट्रक जप्त

पुण्यातील चार ट्रक पनीर-खवा जप्त केल्याच्या कारवाईनंतर आता प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लक्ष लागलं आहे. अहवालानंतर या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Tukaram Mundhe: मोठी बातमी! गणेशोत्सवाआधी तुकाराम मुंढेंचा पुण्यात दणका; बुधवार पेठेतून पनीर-खव्याने भरलेले 4 ट्रक जप्त
तुकाराम मुंढेImage Credit source: Tv9
| Updated on: Sep 11, 2026 | 11:39 AM
Share

Tukaram Mundhe: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरात करण्यात आलेल्या धडक कारवाईत पनीर आणि खव्याने भरलेले तब्बल चार ट्रक जप्त करण्यात आले आहेत. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि संभाव्य भेसळीवर लक्ष ठेवण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, दूधजन्य पदार्थ, पनीर, खवा आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याच काळात भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचा पुरवठा होण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करता FDA कडून बाजारपेठांमध्ये तपासणी आणि कारवाईला वेग देण्यात आला आहे.

बुधवार पेठेत FDA ची अचानक कारवाई

पुण्यातील बुधवार पेठ परिसरात FDA च्या पथकाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर पनीर आणि खव्याचा साठा ताब्यात घेतला. या कारवाईसाठी मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. चार ट्रकमध्ये असलेला हा साठा पाहता कारवाईचं गांभीर्य लक्षात येते. जप्त करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी झाल्यानंतर संबंधित पदार्थांची गुणवत्ता आणि ते अन्नसुरक्षा निकषांनुसार आहेत की नाही, याबाबत अधिक स्पष्टता मिळणार आहे.

सणासुदीत अन्नभेसळीवर FDA ची नजर

गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांची विक्री होते. गणेशोत्सवाच्या आधीच FDA ने कारवाईला सुरुवात केल्याने अन्न व्यावसायिकांमध्येही सतर्कता वाढली आहे. विशेषतः पनीर, खवा, दूध, तूप, मिठाई यांसारख्या पदार्थांवर प्रशासनाकडून विशेष लक्ष दिलं जात आहे. दरम्यान, सण आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाटल्या जाणाऱ्या महाप्रसाद, भंडारा आणि सामूहिक अन्नवाटपाबाबतही FDA ने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा कार्यक्रमांची पूर्वसूचना किमान सात दिवस आधी देण्याची सूचना करण्यात आली आहे. अन्न तयार करताना स्वच्छता, सुरक्षित पाणी, योग्य तापमान आणि अन्नसाठवणुकीचे नियम पाळणं आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

Follow Us
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुक..
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुकीत
शारीरिक व्याधी बऱ्या करण्याचे आमिष दाखवून...
सोशल मीडियावरील रील्स पाहून संपर्क, ‘उतारे-विधी’च्या नावाखाली... पुण्यातील महिला भोंदूचा कारनामा
सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ...
Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?