AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे मनसेला जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं? वसंत मोरेंना थेट…

Vasant More Uddhav Thackeray Shivsena: मुंबईत विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पुण्यातही उद्धव ठाकरे गटाने मोठा डाव टाकला आहे. जे मनसेला जमलं नाही ते उद्धव सेनेने करून दाखवलं आहे. वसंत मोरे यांच्याविषयी मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे पुण्यनगरीतील ती अपडेट?

जे मनसेला जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं? वसंत मोरेंना थेट...
वसंत मोरे, उद्धव ठाकरे, मनसे नेते राज ठाकरे Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 30, 2026 | 2:41 PM
Share

Vasant More Uddhav Thackeray Shivsena: मुंबईत विधान परिषद निवडणुकीवर अटीतटीचा सामना सुरू आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव सेनेत ताणतणाव वाढला आहे. दोन्ही पक्षात बैठक सुरू असली तरी समाधानकारक तोडगा निघालेला नाही. त्याचवेळी पुण्यातही उद्धव सेनेने मोठा डाव टाकला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जे करता आले नाही, ते ठाकरे सेनेने पुण्यनगरीत करून दाखवलं. वसंत मोरे यांना त्यांनी मोठं पद दिलं आहे. विद्येच्या माहेरघरात पक्ष मजबुतीसाठी मोठा प्रयत्न केला आहे.

वसंत मोरे उद्धव सेनेचे पुणे शहर प्रमुख

वसंत मोरेंवर उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. मोरे यांना पुण्याचे शहर प्रमुख पद देण्यात आले आहे. आज सकाळीच ठाकरे सेनेकडून ही घोषणा करण्यात आली आहे. माझ्यावर उद्धव ठाकरे यांनी विश्वास ठेवला, त्या बद्दल मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी मला ही संधी दिली. विरोधी पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून काम करेल, अशी प्रतिक्रिया मोरे यांनी दिली आहे.

संजय राऊत यांचा सकाळी मला कॉल आला होता. त्यांनी सांगितलं की पक्ष मजबूत करा. मी सांगितलं आहे की तुमच्या अपेक्षाहून जास्त काम करेल. मी पक्षात आलेली मरगळ झटकून काम करायला लागेल. मला सगळ्या विधानसभेत जनता दरबार घ्यायचे आहेत. जुन्या लोकांना पण मी सोबत घेऊन काम करेल. मी दोन दिवसात मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, असे वसंत मोरे यांनी सांगितले.

मिसिंग लिंक शोधा, एक्सप्रेसवे प्रमाणे धावा

काल परवा संजय राऊत पुण्यात होते. त्यांनी उद्धव सेनेचा मेळावा घेतला. आगामी तीन वर्षात आता कुठल्याच निवडणुका नाहीत. अशावेळी शिवसेनेचे संघटनात्मक काम तळागाळापर्यंत पोहचवा असे आवाहन त्यांनी केले. लोकांमधील मिसिंग लिंकचा शोध घेऊन सेनेचे काम केले, तर पुण्यात शिवसेना एक्सप्रेसवे प्रमाणे सुसाट धावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी पक्षात घटनात्मक बदलाबाबतही संकेत दिले. आता पुण्याच्या शहरप्रमुखपदी वसंत मोरे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरप्रमुखपदी चेतन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन गावडे हे शहर समन्वयक असतील. तर संजय मोरे, गजानन थरकुडे हे सहसंपर्कप्रमुख असतील. गौतम चाबुकस्वार यांच्याकडे पिंपरी चिंचवड सह संपर्क प्रमुख पद असेल.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?