Ajit Pawar : स्वत:चा फोटो मोठा, साहेब, मी आणि सुप्रियाला एकाच फोटोत बसवलं! अजित पवारांनी घेतली कार्यकर्त्याची फिरकी

या छत्रीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे (NCP Leaders) फोटो आहेत. यावरूनच अजित पवारांनी कार्यकर्त्याची फिरकी घेतील. अजित पवारांनी छत्री उघडून पाहिली. निरीक्षण केले.

Ajit Pawar : स्वत:चा फोटो मोठा, साहेब, मी आणि सुप्रियाला एकाच फोटोत बसवलं! अजित पवारांनी घेतली कार्यकर्त्याची फिरकी
छत्रीवाटपाच्या कार्यक्रमप्रसंगी अजित पवार
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Aug 07, 2022 | 9:53 AM

पुणे : स्वत:चा फोटो मोठा, प्रशांत जगतापांचा फोटो मोठा आणि आम्हाला तिघांना एकाच फोटोत ठेवले, अशी फिरकी अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतली. राष्ट्रवादीच्या छत्रीवाटप कार्यक्रमात आपल्या कार्यकर्त्यांची मिश्किलपणे अजित पवारांनी फिरकी घेतली. अजित पवार पक्षाच्या विविध कामानिमित्त पुण्यात होते. त्यांच्या हस्ते पक्ष कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी छत्रीवाटपाचा कार्यक्रमही पार पडला. या छत्रीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे (NCP Leaders) फोटो आहेत. यावरूनच अजित पवारांनी कार्यकर्त्याची फिरकी घेतील. अजित पवारांनी छत्री उघडून पाहिली. निरीक्षण केले आणि कार्यकर्त्याला म्हणाले, की छत्रीवर स्वत:चा फोटो मोठा, प्रशांत जगतापांचा (Prashant Jagtap) वेगळा फोटो आणि साहेबांना, मला आणि सुप्रियाला एकाच फोटोत बसवले, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. त्यानंतर एकच हशा उपस्थितांमध्ये पिकला.

मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारवर टीका

पक्षाचे विविध कार्यक्रम अजित पवारांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्यात मंत्रिमंडळ विस्ता अद्याप झालेला नाही. सरकार येवून 35 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. मात्र दोघेच कारभार पाहत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावर विचारले, तर लवकर करू, लवकरच करू, असे ते सांगत असतात. मात्र आता हे लवकर, लवकर असे म्हणणे बंद करावे, असे अजित पवार म्हणाले. अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्याशिवाय अंकुश निर्माण होत नाही, असे वक्तव्य त्यांनी केले.

हे सुद्धा वाचा

फिरकी घेतली अन् हशा पिकला…

‘अधिकाऱ्यांशी चांगले वागा’

मी गेली 32 वर्षे समाजकारण, राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. अनेक लोक मला सकाळपासून भेटतात. सगळ्यांचीच कामे माझ्याकडून होतात, असा माझा दावा नाही. पण आलेल्या लोकांचे म्हणणे, अडचणी समजावून घेतल्या पाहिजेत. आता जे चालले आहे, ते लोक पाहत आहेत. अधिकाऱ्यांशी चांगले वागले, की सत्ता नसतानाही अधिकारी चांगले वागतात. अनेक जण सत्ता असताना अधिकाऱ्यांशी चांगले वागत नाही, मग सत्ता गेल्यावर अधिकारी त्यांना धडा शिकवतात, असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, एकनाथराव उद्धव ठाकरेंसोबत काम करताना शिस्तीने वागायचे, आता वेगळेच सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें