
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणाने राज्य सुन्न झाले. याप्रकरणी तिचा सासरा-सासू, मोठा दीर, नणंद आणि त्यांना मदत करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पण एकंदरीतच पोलीस आणि महिला आयोगाच्या भूमिकेवर विरोधकांचा रोष दिसून येतो. याप्रकरणी त्यांची भूमिका संशयाच्या घेऱ्यात अडकली आहे. तर राजेंद्र हगवणे याने या आत्महत्याप्रकरणी कसलाच पश्चाताप नसल्याचे समोर आले होते. पोलिसांनी तपासाअंती राजेंद्र आणि त्याचा मुलगा सुशील यांना अटक केली होती. तर या दोन्ही बापलेकांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात दोघांचा माज दिसून येत आहे.
गौतमीला बैलासमोर नाचवलं
हुड्यासाठी सुनांचा छळ करणारे हगवणे कुटुंबियांचा तमाशा यापूर्वी सुद्धा समोर आला आहे. एकीकडे दुसऱ्यांच्या लेकीबाळींवर अन्याय करायचा. त्यांच्यावर माहेरावरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकायचा आणि दुसरीकडे त्या पैशांवर बैलाचा वाढदिवस साजरा करायचा असा प्रकार घडल्याचे दिसून आले.
हगवणे कुटुंबाने बैलाचा वाढदिवस साजरा केला. गौतमी पाटील ही या कार्यक्रमात बैलासमोर नाचताना दिसली. या कार्यक्रमाच्या बॅनरवर सुशील हगवणे याचा फोटो दिसून आला. याच सुशील आणि त्याचे वडील राजेंद्र हगवणे यांचा आता एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत या कुटुंबाचा मुजोरपणा दिसला.
बापाच्या जीवावर हवा
मुजोर हगवणे पिता पुत्राचा नवा प्रताप समोर आला आहे. याविषयीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात सुशील हगवणेचा माज दिसून येत आहे. या नव्या व्हिडीओची समाज माध्यमावर चर्चा होत आहे. यापूर्वी बैलाचा वाढदिवस साजरा करताना नृत्य कलाकार गौतमी पाटील हिला बैलासमोर नाचावल्याचे उघड झाले होते. तर आता सुशील हगवणे हा त्याच्या वडिलांसोबत एका घोड्यावर बसलेला दिसून येत आहे.
‘माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा’ असे तो बोलत आहे. त्याचा माज या व्हिडिओत दिसून येत आहे. तो घोड्यावर बसून ऐटीत त्यावर रपेट मारताना दिसतो. सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणेचा नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.