AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Encounter : मध्यरात्री संभाजीनगरमध्ये थरार, अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालताच…

Midnight Encounter in Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आणि कथित दरोडेखोरात धुमश्चक्री उडाली. घरफोडी प्रकरणातील आरोपीला पकडताना गोळीबार झाला. यामध्ये आरोपी अमोल खोतकर याचा एन्काऊंटर झाला. कोण आहे हा आरोपी?

Encounter : मध्यरात्री संभाजीनगरमध्ये थरार, अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालताच...
अमोल खोतकर एन्काऊंटरImage Credit source: गुगल
| Updated on: May 27, 2025 | 9:37 AM
Share

Amol Khotkar Encounter : छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री थरार घडला. शहराजवळील वडगाव कोल्हाटी या परिसरात पोलीस आणि कथित दरोडेखोरामध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. नुकत्याच उद्योजकाच्या घरावरील दरोड्याप्रकरणात आरोपीचा शोध सुरू होता. तो वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याचे समजताच पोलिसांचा फौजफाटा तिथे पोहचला. तेव्हा आरोपीने गोळीबार केला. पोलिसांच्या अंगावर अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत अमोल खोतकर याचा एनकाऊंटर झाला. या कारवाईत तो जागीच ठार झाला.

काय आहे प्रकरण

छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर नुकताच दरोडा घालण्यात आला होता. 7 मे रोजी ते कुटुंबियांसह अमेरिकेला गेले होते. त्यांच्या विश्वासू संजय झळके हा केअरटेकर म्हणून बंगल्यात काम करत होता. 15 मे रोजी रात्री 2 ते 4 या दरम्यान 6 दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर या बंगल्यातून साडेपाच किलो सोने आणि 32 किलो चांदी असा 6 कोटींचा ऐवज लंपास केला होता. या दरोड्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. वाळूज एमआयडीसी ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. 11 दिवसांपासून गुन्हे शाखेचे 7 आणि एमआयडीसी वाळूज ठाण्यातील 2 अशी पथकं तपास करत होती. त्याचवेळी अमोल खोतकर हा कोल्हाटी भागातील कचरापट्टी भागात लपल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते. मध्यरात्री त्याला अटक करण्याची तयारी करण्यात आली होती.

पाच जण अटकेत, अमोलचा तपास

या दरोडा प्रकरणात पोलिसांनी तपासाअंती 5 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर या दरोड्याचा अमोल हा सूत्रधार असल्याचे समोर येत होते. त्याला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. त्यातच तो वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याचे समोर आले होते. त्याला अटक करण्यासाठी गुप्तता बाळगण्यात आली होती. काल मध्यरात्री पोलिसांनी तो असलेल्या परिसराला गराडा घातला. त्याची चाहुल आरोपीला लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपीने गोळीबार करत पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा एन्काऊंटर झाल्याचे समोर आले आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.