AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update : ओमीक्रॉनचे 4 सब व्हेरिएंट, 1000 सक्रिय रुग्ण, सतर्कतेचा इशारा, तज्ज्ञांचा दावा काय

Covid-19 Omicron : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी देशात कोविड-19 सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 1009 वर पोहचली आहे. यामध्ये 752 नवीन रुग्णांची भर पडली होती. केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.

Corona Update : ओमीक्रॉनचे 4 सब व्हेरिएंट, 1000 सक्रिय रुग्ण, सतर्कतेचा इशारा, तज्ज्ञांचा दावा काय
देशात यावर्षी कोविड-19 ने आतापर्यंत 51 लोकांचा बळी घेतला आहे. तर गेल्या 24 तासात 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. मयतांमध्ये सहा वृद्ध तर एक 5 महिन्यांचे बळ आहे. Image Credit source: गुगल
| Updated on: May 27, 2025 | 8:52 AM
Share

देशात कोरोना व्हायरसने पुन्हा डोकेवर काढले आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (ICMR) सोमवारी भारतात कोविड-19 व्हेरिएंट्सचे गंभीर लक्षण दिसत नाहीत. देशात ओमीक्रॉनचे 4 सब व्हेरिएंट्स दिसून आले आहे. तर केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी कोविडची आकडेवारी सादर केली. त्यानुसार, देशात कोविड-19 सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 1009 वर पोहचली आहे. यामध्ये 752 नवीन रुग्ण वाढले आहेत.

चिंतेचा विषय नाही

ICMR चे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी सोमवारी या आजाराच्या संसर्गाविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, सध्या चिंतेचा विषय नाही. कोविडच्या नवीन स्वरुपाविषयी माहिती घेण्यात आली आहे. पश्चिम आणि दक्षिणेतून त्यासाठी काही नमुने गोळा करण्यात आले होते. यामध्ये कोविडचे नवीन व्हेरिएंट दिसले. पण ते गंभीर नाही, अशी माहिती बहल यांनी दिली. हे सर्व ओमीक्रॉनचे उप संसर्ग असल्याचे दिसले. यामध्ये LF.7, XFG, JN.1 आणि NB. 1.8.1 यांचा समावेश आहे.

सक्रिय रुग्णांमध्ये वाढ

बहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. पूर्वी दक्षिण भारतात, पश्चिम आणि उत्तर भारतात रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या सर्व केसेस विषयी एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमातंर्गत लक्ष ठेवण्यात येत आहे. यापूर्वी कोरोनाचे रुग्ण दोन दिवसात दुप्पट होत होते. पण सध्या अशा केसेस येत नसल्याचे आणि देशात सब व्हेरिएंट सक्रीय असल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकांनी सामान्य सावधगिरीसंबंधी ज्या सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन करण्याचे आणि वेळीच वैद्यकीय तज्ज्ञाकडे इलाज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणता ताप, सर्दी, पडसे अंगावर न काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती गंभीर नसल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाने हातपाय पसरले

महाराष्ट्रात कोरोनाने हातपाय पसरले आहेत. सोमवारी राज्यात 7,830 सॅम्पल घेण्यात आले. त्यात 369 रुग्ण कोविड19 पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले. मुंबईत काल 69 नवीन रुग्णांची भर पडली. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 278 च्या जवळपास आहे. तर राज्यात सोमवारपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 4 वर पोहचला.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.