Pune Water : दिलासादायक! पुणेकरांना यंदा करावा लागणार नाही पाणीटंचाईचा सामना, कोणत्या धरणात किती पाणी? वाचा सविस्तर….

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील एकूण शिल्लक पाणीसाठा, शहरासाठी राखीव कोटा आणि दरमहा आवश्‍यक पाणी यांच्या आकडेवारीची तुलना केल्यास, शहराला आणखी किमान दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Pune Water : दिलासादायक! पुणेकरांना यंदा करावा लागणार नाही पाणीटंचाईचा सामना, कोणत्या धरणात किती पाणी? वाचा सविस्तर....
पानशेत धरण 100 टक्के भरले, खडकवासला धरणातून 1712 क्युसेकने विसर्ग
Image Credit source: tv9
अश्विनी सातव डोके

| Edited By: प्रदीप गरड

May 20, 2022 | 10:28 AM

पुणे : पुण्यातील धरणांमध्ये (Pune Dams) एकूण 7.75 टीएमसी एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सुमारे अडीच टीएमसी पाणी पुणे शहरासाठी राखीव आहे. 16 जुलैपर्यंत पुरेल इतकाच हा पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. पाणीसाठ्याच्या आकडेवारीचा अहवाल जलसंपदा विभागाकडून (Water Resources Department) प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. मात्र उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसल्याने दिलासादायक चित्र सध्या समोर आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतील धरणांच्या तुलनेत हा पाणीसाठा (Water stock) कमी आहे. याविषयीची माहिती जलसंपदा विभागाने आधीच दिली होती. जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या शिल्लक असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्याच्या आकडेवारीचा अहवाल जलसंपदा विभागाकडून नुकसाच प्रसिद्ध करण्यात आला आहे. 19 मेअखेरचा हा अहवाल आहे.

सव्वा टीएमसी पाणी आवश्‍यक

पुणे शहराला दरमहा सरासरी सव्वा टीएमसी पाणी आवश्‍यक आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील एकूण शिल्लक पाणीसाठा, शहरासाठी राखीव कोटा आणि दरमहा आवश्‍यक पाणी यांच्या आकडेवारीची तुलना केल्यास, शहराला आणखी किमान दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत या चार धरणांमध्ये मिळून 9.82 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा 2.07 टीएमसी इतका कमी झाला आहे.

11.5 टीएमसी इतका पाण्याचा कोटा मंजूर

जलसंपदा विभागाकडून पुणे शहराला वर्षाला सुमारे 11.5 टीएमसी इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात वर्षाला सुमारे 16 टीएमसी पाणी वापर पुणे शहराकडून केला जात आहे. प्रत्यक्ष पाणी वापराच्या संख्येचे समान बारा भाग केल्यास, शहराला महिन्याला दरमहा सुमारे 1.33 टीएमसी पाणी आवश्‍यक आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यापैकी सुमारे 1 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होईल, असे गृहित धरले आहे. उर्वरित 6.75 पैकी सिंचनासाठी सव्वाचार टीएमसी पाणी राखीव असणार आहे. त्यामुळे शहरासाठी अडीच टीएमसी इतके पाणी राखीव राहिले आहे.

पुण्यातील धरणांमधला शिल्लक उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)

– पानशेत – 3.12

– वरसगाव – 3.57

– खडकवासला – 0.71

– टेमघर – 0.35

– एकूण उपयुक्त पाणीसाठा – 7.75

– गतवर्षी या तारखेपर्यंतचा शिल्लक पाणीसाठा – 9.82

– गतवर्षीच्या तुलनेत कमी झालेला पाणीसाठा – 2.07

– चार धरणांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा – 29.15

– चार धरणांमधील एकूण अचल पाणीसाठा – 1.91

हे सुद्धा वाचा

– चार धरणांमधील एकूण साठा – 31.06

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें