Sanjay Raut : त्यांचे कितीही घोडे उधळू द्या, जिंकणार तर आम्हीच; राऊतांनी भाजपला फटकारले

Sanjay Raut : मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी आज यूटर्न घेतला. सुप्रिया सुळे तसे बोलल्याच नाहीत. चुकीचं काही दाखवू नका. त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut : त्यांचे कितीही घोडे उधळू द्या, जिंकणार तर आम्हीच; राऊतांनी भाजपला फटकारले
शिवसेनेची मुलखमैदानी तोफ उद्या अयोध्येत, युवराजांच्या दौऱ्याआधी संजय राऊत करणार पाहणीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 2:17 PM

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत भाजपने सातवा उमेदवार दिला आहे. त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर (bjp) जोरदार निशाणा साधला आहे. राज्यसभा निवडणुकीतही (rajya sabha election) ते तपास यंत्रणांचा वापर करतील याची मला चिंता वाटते. घोडेबाजार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्यांचे घोडे कितीही उधळू द्या, आम्हीच जिंकणार आहोत. जिंकण्यासाठी जी मते हवी आहेत, ती आमच्याकडे आहेत, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सांगितलं. ते आज पुण्यात होते. पुण्यात राऊत यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी भाजपला फटकारलं. तसेच राज्यसभेची उमेदवारी कुणाला द्यावी आणि कुणाला नाही हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी फारसा बोलणार नाही, असंही राऊत यांनी सांगितलं.

जे उभे राहत आहेत. त्यांना विरोध केला जात आहे. केंद्रीय यंत्रणांच्या धाडी टाकल्या जात आहेत. दिल्लीत सत्येंद्र जैन आहेत. ते आपचे नेते आहेत. हिमाचल प्रदेशाची तयारी करत होते. त्यांना आठ वर्षापूर्वीच्या प्रकरणात आत टाकलंय. त्यांच त्यांना आव्हान वाटतं होतं. महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि माझ्यासह दबावाचं राजकारण सुरू आहे. पण आम्ही त्याला घाबरत नाही, असं राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सावध पावलं टाका, काँग्रेसला सल्ला

काँग्रेसने राज्यसभेसाठी उत्तर प्रदेशातील नेत्याला महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेसने सावध पावली टाकली पाहिजे. बाहेरची माणसं पाठवतात. त्याचा परिणाम हा महाराष्ट्रात होऊ शकतो. महाराष्ट्रातही तोलामोलाची माणसं आहेत. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही बाहेरचेच उमेदवार आहेत. आम्हाला काँग्रेसची गरज आहे. भविष्यात काँग्रेसनं उभारी घेतली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंना काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा

यावेळी त्यांनी महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंना शरद पवारांचा पाठिंबा आहे. काँग्रेसचाही आहे. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे राहणं ही देशाची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.

राऊतांचा यूटर्न

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी आज यूटर्न घेतला. सुप्रिया सुळे तसे बोलल्याच नाहीत. चुकीचं काही दाखवू नका. त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असं राऊत म्हणाले. मुख्यमंत्रीपदाबाबत सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केलं. पण त्या तश्या बोलल्याच नाहीत. त्या तशा बोलल्या नाहीत. चुकीचं दाखवू नका, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.