Sanjay Raut : आम्हीही देशी खेळात पटाईत, शरद पवार तर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Sanjay Raut : हनुमान चालीसा आम्हालाही येतो. आम्ही भोंगे लावून सांगत नाही. मात्र देशासमोर अनेक प्रश्न आहेत. आम्ही रस्ते, बेरोजगारी यावर काम करतोय. हे शिवसैनिक करतो. आम्हीही भोंगे लावू. पण ते महापालिकेत काय काम केलं हे सांगण्यासाठी.

Sanjay Raut : आम्हीही देशी खेळात पटाईत, शरद पवार तर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
आम्हीही देशी खेळात पटाईत, शरद पवार कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
Image Credit source: tv9 marathi
प्रदीप कापसे

| Edited By: भीमराव गवळी

Jun 01, 2022 | 1:31 PM

पुणे: बुद्धिबळांच्या चालींप्रमाणेच राजकारणातील चाली असतात. विजयी होऊन देखील ग्रँड मास्टरला हरावं लागलं हे 2019ला उभ्या महाराष्ट्राने पाहिलं, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केलं होतं. फडणवीसांच्या या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. आमच्याकडेही पट आहेत. आम्हीही देशी खेळात पटाईत आहेत. फक्त संगीत खुर्ची खेळत नाही. खुर्ची आमच्याकडेच आहे. शरद पवार (sharad pawar) हे कुस्तगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत, असा पलटवार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. ते पुण्यात सांस्कृतिक भवनाच्या उद्धाटन प्रसंगी बोलत होते. महिलांच्या डोक्यावर निळा फेटा आहे. हे महाराष्ट्रासाठी आशादायी चित्रं आहे. निळा आणि भगवा एकत्र दिसला की महाराष्ट्राची ताकद दिसते. निळी शक्ती आणि भगवी शक्ती एकत्र आली की पराभव कोणी करू शकत नाही असं बाळासाहेब म्हणयाचे. महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही महामानव प्रेरणा देणारे आहेत. या दोघांनी लोकांना लढायला शिकवलं. शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य आणलं तर आंबेडकरांनी कायद्याचं राज्य आणलं, असंही राऊत म्हणाले.

राजकारणात आजकाल अहंकार वाढला आहे. हे कोणी तरी मोदींना सांगायला हवं. या मतदारसंघात 42 जागा आहेत पण लढणाऱ्या शिवसैनिकांनाच उमेदवारी मिळेल. महाविकास आघाडी होईल, नाही हा पुढचा प्रश्न आहे. मात्र पुणे महापालिकेलर भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पुण्यात शिवसंपर्क मेळाला झाला. मी कोल्हापूरात असताना टीव्हीवर पाहिला. छान वाटलं. आपली ताकद वाढत आहे. पुणे शहराला दिशा देण्याचं काम केलं पाहिजे. मोजके नगरसेवक आहेत. मात्र काम करतायेत. नगरसेवक म्हणून काम कसं करावं हे दाखवून देतायेत. पळून गेले त्यांना विसरून जा. आपण टिकून आहात. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहिलेत, असं राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे देशाची गरज

मुख्यमंत्रीपदाबाबत सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केलं. पण त्या तश्या बोलल्याच नाहीत. त्या तशा बोलल्या नाहीत. चुकीचं दाखवू नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत. शरद पवारांचा पाठिंबा आहे. काँग्रेसचाही आहे. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे राहणं ही देशाची गरज आहे, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आम्हीही भोंगे लावू, पण…

हनुमान चालीसा आम्हालाही येतो. आम्ही भोंगे लावून सांगत नाही. मात्र देशासमोर अनेक प्रश्न आहेत. आम्ही रस्ते, बेरोजगारी यावर काम करतोय. हे शिवसैनिक करतो. आम्हीही भोंगे लावू. पण ते महापालिकेत काय काम केलं हे सांगण्यासाठी. तुम्ही काय केलं? पाच वर्षे लोकांसाठी काय केलं ते सांगू. कोरोना काळात चांगल काम केलं, असंही त्यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आमचे दोनच दैवत आहेत. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर. एकानं रयरतेच राज्य निर्माण केलं दूसऱ्यानं कायद्याचं राज्य निर्माण केलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें