Weather Alert Monsoon prediction : विदर्भात 100 टक्के, मराठवाड्यात 98 टक्के, यंदा कोणत्या विभागात किती पाऊस?

डॉ.रामचंद्र साबळे यांनी महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस 99 टक्के पडेल असा अंदाज वर्तवला आहे. Weather Alert Monsoon prediction

Weather Alert Monsoon prediction : विदर्भात 100 टक्के, मराठवाड्यात 98 टक्के, यंदा कोणत्या विभागात किती पाऊस?
Weather Update

पुणे : भारतीय हवामान विभागाचे माजी प्रमुख अधिकारी ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी महाराष्ट्रात यंदा पाऊस सरासरीच्या 99 टक्के होईल, असा अंदाज वर्तवला आहे. डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषाच्या आधारे काढण्यात आला आहे. (Weather Alert Pune based Retired IMD Officer Ramchandra Sable predicted 99 percent monsoon for Maharashtra state )

अकोला, पाडेगाव आणि निफाड येथा पावसाचा मोठा खंड

वाऱ्याचा वेग, सूर्य प्रकाशाचा कालावाध व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै, महिन्यात अकोला, पाडेगाव निफाड येथे पावसाचा मोठा खंड राहण्याचा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. दुसरीकडे दापोली, पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव व परभणी येथे पावसाचा खंड कमी राहण्याची शक्यता असल्याचं डॉ. साबळे यांनी सांगितलं आहे.

ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चागंला पाऊस

डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात खंड पडेल, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.  विदर्भातील विविध भागात म्हणजे पश्चिम विदर्भात 98 टक्के, मध्य विदर्भात 102 टक्के, पूर्व विदर्भात 100 टक्के, मराठवाडा 98 टक्के, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात 98 टक्के, पश्चिम महाराष्ट्रात 99 टक्के मान्सन बरसेल, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.

डॉ.रामचंद्र साबळे यांनी वर्तवलेला विभागनिहाय अंदाज

Ramchandra Sable weather Prediction

रामचंद्र साबळे यांचा विभागनिहाय अंदाज

मान्सून 3 जूनला केरळमध्ये

भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते.

यंदाचे पर्जन्यमान कसे असेल?

स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

Weather Update: महाराष्ट्रावर मान्सूनपूर्व पाऊस बरसणार?, राज्यातील आजचं वातावरण कसं राहणार?

केरळमध्ये मान्सून दाखल झाला हे कसं ठरवलं जात? हवामान विभागाचे नेमके निकष काय?

(Weather Alert Pune based Retired IMD Officer Ramchandra Sable predicted 99 percent monsoon for Maharashtra state )