AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : अयोध्येला जाऊन राज ठाकरे नेमकं काय करणार होते? नेमका प्लॅन सांगितला

या सर्व गोष्टीची सुरुवात झाली. त्याची रसद पुरवली गेली. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली, हा विषय पुन्हा बाहेर काढा. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सर्वांनी मिळून आराखडा आखला. मी एकाच गोष्टीचा विचार केला. अयोध्येला जाणार हा विचार मनात होतो.

Raj Thackeray : अयोध्येला जाऊन राज ठाकरे नेमकं काय करणार होते? नेमका प्लॅन सांगितला
अयोध्येला जाऊन राज ठाकरे नेमकं काय करणार होते? Image Credit source: t v 9
| Updated on: May 22, 2022 | 1:18 PM
Share

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात सभा घेतली. यावेळी ते म्हणाले, अयोध्या (ayodhya) दौरा रद्द काही लोकांना वाईट वाटलं काहींना आनंद झाला. काही लोक कुत्सित बोलत होते. त्यामुळे दोन दिवसांचा मुद्दाम बफर दिला. काय बोलयाचं ते बोला. मग मी माझी भूमिका महाराष्ट्र आणि देशाला सांगेल. ज्या दिवशी लाऊडस्पीकर (loudspeaker) बंदची घोषणा केली. त्यानंतर पुण्यात मी अयोध्येला जाणार याची तारीख जाहीर केली. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. अयोध्येला येऊ देणार नाही. मी पाहत होतो. काय चाललं नेमकं. मला मुंबईतून माहीत मिळत होती. दिल्लीतून माहिती मिळत होती. उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती. नेमकं काय चाललंय. एक वेळ चाललं की हा ट्रॅप (Trap) आहे. या सापळ्यात आपण आडकलं नाही पाहिजेत, असं ठरवल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पाहा व्हिडीओ

नेमका प्लॅन काय?

या सर्व गोष्टीची सुरुवात झाली. त्याची रसद पुरवली गेली. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली, हा विषय पुन्हा बाहेर काढा. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सर्वांनी मिळून आराखडा आखला. मी एकाच गोष्टीचा विचार केला. अयोध्येला जाणार हा विचार मनात होतो. राम जन्मभूमीचं दर्शन घेणं आलं. पण मला वाटतं तुम्ही जन्मालाही आला नसतील. तुमच्या पैकी. तेव्हा चॅनेल्स नव्हती. तेव्हा दुरदर्शन होतं. त्यावेळचे पत्रकार होते. त्यावेळी न्यूज रिल्स चालवायचे अर्ध्या तासाचे. मला आठवतं. तेव्हा मुलायमसिंह मुख्यमंत्री होते. तेव्हा कारसेवक अयोध्येला गेले होते. त्यांना ठार मारलं होते. त्यांची प्रेतं शरयू नदीत तरंगताना पाहिली होती. दर्शन घ्यायचं होतंच. कारसेवक जिथे मारले गेले. ती जागा अयोध्येत आहे. त्याचं दर्शन घ्यायचं होतं. राजकारणात अनेकांना भावना समजून घेत नाहीत, हेही राज ठाकरे यांनी सभेत सांगितलं.

शेतकरी आत्महत्येचा विषय गंभीर

ते म्हणाले, महाराष्ट्रात अनेक विषय आहे. शेतकऱ्याचा ऊस घेतला नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. काहीच नाही. एक बातमी आली. आम्ही थंड गोळे. आम्हाला लाज वाटत नाही. शरम वाटत नाही. आम्ही थंड आहोत. या थंड बसण्यात काहीही क्रिया न करण्यात परकियांनी नवशे वर्षे आपल्यावर सत्ता केली. मराठीशाहीचा काळ सोडला तर आपला देश पारतंत्र्यात होता. 1947 साली ही भूमी स्वातंत्र झाली. आम्ही बेसावध असतो. मोबाईलमध्ये कोणत्या क्लिप आल्या. फॉरवर्ड करतो. एवढेच करतोय.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.