AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 20: भाजप खासदाराच्या लेकीला तडकाफडकी ‘बिग बॉस 20’मधून का काढलं? नेमकं काय घडलं?

Bigg Boss 20: अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी यांची लेक रीती तिवारी अचानक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. बिग बॉसच्या मिड-वीक एविक्शनमध्ये रीतीचं नाव का आलं, याविषयी विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Bigg Boss 20: भाजप खासदाराच्या लेकीला तडकाफडकी 'बिग बॉस 20'मधून का काढलं? नेमकं काय घडलं?
मनोज तिवारी, रीती तिवारी, सलमान खानImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 02, 2026 | 12:36 PM
Share

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’च्या घरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली रीती तिवारी आता शोमधून अचानक बाहेर पडली आहे. रीती ही अभिनेता आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांची मुलगी आहे. तिचं अचानक झालेलं मिड-वीक एविक्शन प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरलं आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच सलमान खानने ‘वीकेंड का वार’मध्ये रीतीच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे तिच्या एविक्शनचा आणि सलमानच्या फटकारणीचा संबंध आहे का, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

काजी तौकीरसोबतचा वाद ठरला चर्चेचा विषय

रीती तिवारी आणि काजी तौकीर यांच्यातील वादाने ‘बिग बॉस 20’मध्ये मोठं वळण घेतलं. कॅप्टन्सी टास्कदरम्यान झालेल्या डिस बॅटलमध्ये रीतीने उदिती सिंह आणि काजी यांच्याविरोधात काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. या प्रसंगात रीतीने काजीला उद्देशून तिच्या वडिलांचा उल्लेखही केला होता. या प्रकरणानंतर ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने रीतीला तिच्या भाषेवरून सुनावलं. तिच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित करताना सलमानने तिला तिच्या वडिलांच्या नावाचा आधार घेऊन धमकी देणं योग्य नसल्याचं स्पष्ट केलं. रीतीने स्वतःला ‘रॉकस्टार’ म्हणण्याच्या दाव्यावरही सलमानने प्रश्न उपस्थित केले होते.

सलमान आणि रीतीमधील संभाषणात तिच्या वडिलांचा विषयही आला. सलमानने सांगितलं की, ती मनोज तिवारींची मुलगी असल्यामुळे तिच्या प्रत्येक कृतीचं श्रेय किंवा दोष तिच्या वडिलांना जाऊ नये. स्वतःची ओळख आणि व्यक्तिमत्त्व तिने आपल्या वागणुकीतून निर्माण करावं, असा मुद्दा त्याने मांडला. याच पार्श्वभूमीवर रीतीला शोमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मनोज तिवारींच्या प्रभावाचा वापर झाला का, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. मात्र मनोज तिवारी यांनी हे आरोप फेटाळले. मला रीतीची ‘बिग बॉस’मध्ये निवड झाल्याची माहिती आधीच नव्हती, असं त्यांनी सांगितलं.

रीतीला अचानक घराबाहेर का जावं लागलं?

रीतीचं एविक्शन नेहमीच्या प्रेक्षकांच्या मतदानामुळे झालेलं नाही. ‘बिग बॉस’ने कॅप्टन्सी टास्कदरम्यान माही विज, उदिती सिंह आणि यंग डीएसए या तीन दावेदारांना नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी एकाला घराबाहेर करण्याचा निर्णय घेण्याची संधी दिली. चर्चेनंतर तिघांनी रीती तिवारीचं नाव निवडलं. त्यामुळे तिचा प्रवास मिड-वीक एविक्शनमध्ये संपला.

त्यामुळे सलमान खानने फटकारल्यानंतर रीतीला थेट घराबाहेर काढण्यात आलं, असं थेट म्हणणं योग्य ठरणार नसल्याचं काही प्रेक्षक म्हणत आहेत. मात्र, रीती तिच्या वादग्रस्त वर्तनामुळे ती आधीच चर्चेत होती आणि त्याच काळात झालेल्या विशेष टास्कमध्ये तिचं नाव निवडलं गेलं. त्यामुळे सलमानच्या संभाषणानंतर तिच्या प्रवासाला मिळालेलं हे अनपेक्षित वळण सध्या ‘बिग बॉस 20’च्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलं आहे.

Follow Us
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो.
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो धावपटूंचा प्रतिसाद
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच...
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच लागली डुलकी; VIDEO व्हायरल!
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....