काय आहे चक्की गुळ ? मागणी वाढली ; भावही वधारले

काय आहे चक्की गुळ ? मागणी वाढली ; भावही वधारले
jaggery

शहरातील गुलटेकडी बाजारात रोज पाचशे ते एक हजार बॉक्स गूळ दाखल होत असून त्याला घरगुती ग्राहकांसह मिठाईविक्रेते, कारखानदार, लघुउद्योगांकडून चांगली मागणी आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 04, 2022 | 7:00 AM

पुणे – नवीन वर्षात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात गुळाची मागणी वाढू लागली आहे. वाढत्या मागणीला अनुसरून बाजारात गुळाची आवाक वाढली आहे. कोरोनानंतर प्रथमच बाजार स्थिरावत असताना गुळाच्या भावातही वाढ झालेली दिसून आली आहे. शहरातील गुलटेकडी बाजारात रोज पाचशे ते एक हजार बॉक्स गूळ दाखल होत असून त्याला घरगुती ग्राहकांसह मिठाईविक्रेते, कारखानदार, लघुउद्योगांकडून चांगली मागणी आहे.

या शहरातून मालाचा पुरवठा ओमिक्रॉनचे सावट असले तरी बाजारपेठा सुरळीत सुरु आहेत.बाजारात दाखल होत असलेला माल पुणे जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, भिवंडी येथे पाठविण्यात येत आहे. मार्केट यार्डातील गूळ बाजारात जिल्ह्यासह कराड, पाटण, सांगली येथून एक, अर्धा व पाव किलो अशा बॉक्स स्वरूपात चिक्की गुळाची आवक होते. यामध्ये दौंड तालुक्यातील केडगाव, दापोडी भागातून सर्वाधिक दोनशे ते अडीचशे बॉक्स बाजारात दाखल होत आहेत. गतवर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सणांवर मर्यादा आल्याने चिक्की गुळाला मागणी कमी होती.

गतवर्षीच्या तुलनेत मागणी वाढली गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगली मागणी आहे. बाजारात तीस, दहा किलोंसह एक, अर्धा व पावकिलो स्वरूपात चिक्की गूळ उपलब्ध आहे. सध्या लघुउद्योजक, कारखानदारांकडून अधिक मागणी आहे. जानेवारी महिन्यात घरगुती ग्राहकांकडून मागणी वाढेल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनापासून वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. मिठाई विक्रेत्यांची दुकानेही खुली असल्याने चिक्की गुळाला मागणी चांगली अधिक आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने यंदा चिक्की गुळाच्या भावात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर या गुळाचे उत्पादन घेण्याकडे शेतकरी वर्गाचा कल राहतो.

काय आहे चिक्की गूळ

काय आहे चिक्की गूळ शेतकरी दर्जेदार ऊस राखून ठेवतो. ऐन संक्रातीच्या आधी याच्या उत्पादनास सुरुवात केली जाते. चिक्की गूळ वर्षभरातून एकदाच तयार केला जातो. 15 डिसेंबरपासून दहा जानेवारीपर्यंत बाजारात गूळ विक्रीसाठी पाठविण्यात येतो. सध्या दररोज दोनशे ते सव्वादोनशे बॉक्सची निर्मिती शेतकऱ्यांच्याकडून केली जाते. या गुळामध्ये मऊ, चिकट व घट्टपणा जास्त असतो. हा गूळ काजू, शेंगदाणा, तीळ आदी पदार्थ घट्ट धरून ठेवतो. तसेच तो खायला अधिक गोड असल्याने गूळवडी, पोळी, तीळपापडी, लाडू करण्यासाठी त्याचा वापर अधिक होतो. खाद्यपदार्थांना एक वेगळी चव राहावी यासाठी गृहिणींकडून केशर, सुंठ तसेच वेलदोड्याचा वापर करण्यात येतो. या गुळाला फक्त संक्रांतीच्या काळातच मोठी मागणी असते. ​बाजारात तीस, दहा किलोंसह एक, अर्धा व पावकिलो स्वरूपात चिक्की गूळ उपलब्ध आहे. लघुउद्योजक, कारखानदारांकडून अधिक मागणी आहे. जानेवारी महिन्यात घरगुती ग्राहकांकडून मागणी वाढेल.

चिक्की गुळाचे असे आहेत दर तीस किलो – 4 हजार 100 ते 4 हजार 300 दहा किलो – 4 हजार ते 4 हजार 400 एक किलो – 43 ते 48 अर्धा किलो – 45 ते 50 पाव किलो – 47 ते 52

Rohit Pawar| आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन

रक्तदान शिबिरात प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेतली आणि त्याच कार्यक्रमात वापर, केडीएमसीच्या उपायुक्तांना पाच हजार रुपयांचा दंड

Buldhana Murder : भावाच्या मदतीसाठी आलेल्या युवकाचे अपहरण करुन मारहाण, चौघांना अटक

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें