म्हणून क्षणात पुलाचे 2 तुकडे झाले, इंद्रायणी नदीवरील अपघाताची 3 धक्कादायक कारणं समोर!
पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. काही पर्यटक दगावल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

Pune Indrayani River Bridge Pool Collapse : पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा या पर्यटणस्थळाच्या परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 25 जण वाहून गेले आहेत. आमदार सुनिल शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्गटनेत आतापर्यंत 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा अपघात घडण्यमागाची पाच कारणं समोर आली आहेत.
1) जीर्ण झाला होता पूल
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार इंद्रायणी नदीवरील हा दुर्घटनाग्रस्त पूल जीर्ण झाला होता. त्यामुळे हा पूल जास्त वजन सहण करण्यास अक्षम होता. परिणामी पर्यटकांचे जास्त वजन झाल्याने हा पूल क्षणात कोसळला. या पुलाचे थेट दोन तुकडे झाले.
2) पुलावरून नेण्यात आल्या दुचाकी
हा पूल अगोदरच जीर्णावस्थेत होता. असे असताना या पुलावरून जास्त वजन असणाऱ्या दुचाकी नेल्या जात होत्या. अपघातावेळीही या पुलावरून दुचाकी जात होती. तसेच पर्यटकही एका बाजूहून दुसऱ्या बाजूला जात होते. हा पूल हवेतही हलत होता. या सर्व बाबींमुळे पूल ओव्हरवेट झाला आणि क्षणात कोसळला.
3) अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली अन् पूल कोसळला
रविवार असल्याने आज शासकीय तसेच खासगी कार्यालये तसेच शाळांना सुट्टी होती. त्यामुळे आज कुंडमळा हे पर्यटनस्थळ पाहण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही वाढली. हा पूल अगोदरच जीर्ण झालेला होता. त्यामुळे तो अचानकपणे कोसळला आणि पुलावरून जाणारे 20 ते 25 पर्यटक अचानक इंद्रायणी नदीत कोसळले.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
ही दुर्घटना झाल्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफच्या जवानांना आतापर्यंत पाच जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे.
पर्यटक किती दूर जातायत, याचा अंदाज घेतला जातोय
दुर्घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. 20 ते 25 रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. दुर्घटनाग्रस्त पूल हा लोखंडी होता. पण जीर्णावस्थेत असल्याने तो कोसळला. या भागात स्थानिक पोलीसही पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांत या भागात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे इंद्रायणी नदी सध्या ओसंडून वाहते आहे. त्यामुळे वाहून गेलेले पर्यटक नेमके किती दूर गेले असतील, याचा अंदाज एनडीआरएफच्या जवानांकडून घेतल जात आहे आणि बचावकार्य केले जात आहे.
