AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : मुलाला चावा घेतला म्हणून महिलेनं दोन कुत्र्यांना केलं ठार, एफआयआर दाखल

हडपसर (Hadapsar) येथील एका रहिवासी सोसायटीत एका महिलेने दोन भटक्या कुत्र्यांना (Stray dogs) ठार (Killed) मारले आहे. यापैकी एकाने तिच्या मुलाला चावा घेतल्याचे तिचे म्हणणे आणि आरोप आहे.

Pune crime : मुलाला चावा घेतला म्हणून महिलेनं दोन कुत्र्यांना केलं ठार, एफआयआर दाखल
भटकी कुत्री (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Apr 13, 2022 | 1:20 PM
Share

पुणे : हडपसर (Hadapsar) येथील एका रहिवासी सोसायटीत एका महिलेने दोन भटक्या कुत्र्यांना (Stray dogs) ठार (Killed) मारले आहे. यापैकी एकाने तिच्या मुलाला चावा घेतल्याचे तिचे म्हणणे आणि आरोप आहे. हडपसर पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 आणि प्राण्यांना मारणे किंवा अपंग करणे या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या महिलेने 8 एप्रिलच्या रात्री आणि 9 एप्रिलच्या सकाळच्या दरम्यान दोन भटक्या कुत्र्यांना काठीने मारल्याचा आरोप आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे म्हणाले, की आमच्या प्राथमिक माहितीनुसार, एका कुत्र्याने महिलेच्या मुलाला चावा घेतला होता. दोन कुत्र्यांनी चावा घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एका कुत्र्याचा मृतदेह सापडला असून, दुसऱ्याचा शोध घेणे बाकी आहे. दोघेही भटके कुत्रे होते.

सर्व भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची दिली होती धमकी

या महिलेने परिसरातील सर्व भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. रहिवासी तिच्याशी बोलण्यासाठी गेले असता तिने अपशब्द वापरले आणि रहिवाशांच्या पाळीव कुत्र्यांनाही मारण्याची धमकी दिली.

आणखी वाचा :

New York Shooting Suspect : ब्रुकलिन सबवे स्टेशनवर गोळीबार करणाऱ्या संशयीताची ओळख पटली; पोलिसांनी केले संशयीताचे फोटो शेअर

Solapur Accident | ऊस नेणारा ट्रॅक्टर मागे घसरला, ट्रकच्या केबिनमध्ये घुसून चक्काचूर, सोलापुरात भीषण अपघात

Jaipur Crime | आर्मी ऑफिसर असल्याचा बनाव, 50 हून अधिक तरुणींशी संबंध, बलात्कारानंतर निर्घृण हत्या

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली