झिकाचा रुग्ण आढळल्यानंतर बेलसरमध्ये केंद्रीय पथकाची पाहणी, खबरदारी, उपाययोजना पाहून व्यक्त केले समाधान

जिल्ह्यातल्या बेलसरमध्ये झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. केंद्रीय पथकाकडून आज (5 ऑगस्ट) या गावची पाहणी करण्यात आली.

झिकाचा रुग्ण आढळल्यानंतर बेलसरमध्ये केंद्रीय पथकाची पाहणी, खबरदारी, उपाययोजना पाहून व्यक्त केले समाधान
PAHANI PATHAK

पुणे : जिल्ह्यातल्या बेलसरमध्ये झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. केंद्रीय पथकाकडून आज (5 ऑगस्ट) या गावाची पाहणी करण्यात आली. तसेच प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा या पथकाने आढावा घेतला. हे पथक बेलसर गावाचा पाहणी अहवाल केंद्राकडे पाठवणार आहे. या पाहणी अवहवालावर  केंद्र सरकार अभ्यास करणार आहे. (Zika virus patient found in Belsar in Pune district village inspected by central observation team)

उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्यात केंद्रीय पथक दाखल

मागिल महिन्याच्या 30 जुलै रोजी राज्यात पहिल्यांदा झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यासह जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन या गावात तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्यात केंद्रीय पथक दाखल झाले आहे. त्यांनी दोन दिवस जिल्हा प्रशासनाशी बैठकांचे सत्र केल्यानंतर आज बेलसर गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. याशिवाय घरोघरी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच ग्रामस्थांनी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली.

पाहणी करुन पथक केंद्राला अहवाल देणार

दिल्लीतून सर्वेक्षण करण्यासाठी कुटुंब कल्याण मंत्रालयानं हे पथकं पाठवलं आहे. दिल्लीच्या लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पी नैन, डॉ. हिंमत सिंग यांच्यासह राष्ट्रीय हिवताप संशोधन केंद्रातील कीटकतज्ज्ञांचा या पथकात समावेश आहे. बेलसर गावाची पाहणी करुन हे पथक केंद्राला अहवाल देणार आहे.

केरळमध्ये झिका व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले

तीन सदस्य असलेल्या या केंद्रीय पथकाने झिकाबाधित पुरंदरच्या बेलसर गावात दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा गावातल्या स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली. झिका व्हायरसने बाधित झालेली महिला बेलसरमध्ये पहिल्यांदा आढळल्याने आम्ही या भागाचा दौरा करून राज्य सरकारने योग्य उपाययोजना राबवल्या आहेत का ? या संदर्भात केंद्र सरकारला अहवाल देणार आहोत. यापूर्वी केरळमध्ये झिका व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले होते. झिका विषाणू वाढण्यासाठी मच्छर कारणीभूत आहेत. त्यासाठी मच्छरांची संख्या कमी करणे आवश्यक आहे, असे या पथकातील सदस्यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने योग्य खबरदारी घेत उपाययोजना राबवल्या असल्याने या पथकातील शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले.

तसेच यावेळी बोलताना “गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो. ज्यामुळे बाळाला जन्मजात विसंगती होऊ शकतात. हा झिका व्हायरस डासांमुळे होतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे,” असे डॉ. शिल्पी नैन यांनी सांगितले

इतर बातम्या :

मोठी बातमी ! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात 40 अतिरिक्त विशेष ट्रेन, रेल्वे विभागाचा निर्णय

कोरोनामुळे उपासमारीचं संकट ओढावलेल्या शेकडो लोककलावंतांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा, कोविड दिलासा पॅकेजला मान्यता

“अमृता फडणवीस यांना काम नाही, भाजपने त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करावी” मनिषा कायंदेंचा टोला

(Zika virus patient found in Belsar in Pune district village inspected by central observation team)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI