
अजिंक्य धायगुडे/प्रतिनिधी: महापालिका निवडणुकीतील गोंधळ नाट्य अजून संपलेले नाही. एकमेकांची जिरवायच्या नादात अनेक पक्षांनी पायावर धोंडा पाडून घेतल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. तर राज्यात निष्ठावंतांच्या किंकाळ्यांनी सरत्या वर्षाला निरोप दिला आहे. नवीन वर्षातही निष्ठावंतांचा आक्रोश, हंबरडा, टाहो कमी झालेला नाही. आता हे बंडोबा पक्षाला थंड करतात, की पक्ष त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होते हे निकालात समोर येईलच. पण याच गोंधळात आता उपमुख्यमंत्री अजितदादांनी मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची (Ajit Pawar on ZP Election) वार्ता आणली आहे. काय आहे ती अपडेट?
जिल्हा परिषदेची आचारसंहिता लवकरच
कोरेगाव-भीमा येथील 208 व्या शौर्य दिनानिमित्त अजितदादा उपस्थित होते. आज मी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.थंडी खूप आहे. सर्व निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे सूचना जे आहे ते देण्यात आलेले आहेत. चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. दुपार नंतर गर्दी वाढेल असे ते म्हणाले.
त्याचवेळी जिल्हा परिषदेची आचारसंहिता लवकरच लागणार असल्याचे मोठे वक्तव्य अजितदादांनी केले. महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे आचारसंहिता आहे. सध्या महानगरपालिकेच्या आचारसंहिता सुरू आहे, असे ते म्हणाले. तर पुणे पिंपरी चिंचवड मध्ये शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढणार त्याबाबत आज उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले. त्यामुळे याठिकाणची सत्ता समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे आचारसंहितेमुळे कुठली अडचण निर्माण होईल ती होता कामा नये.तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. निवडणूक आयोग त्याबाबतचा निर्णय घेईल. विदर्भातील जिल्हा परिषद उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कोकणातील जिल्हा परिषद पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद आहेत. ते आरक्षण 50 टक्के पर्यंतच घ्या अशा सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत.50% च्या आत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील, असेही दादा म्हणाले.
गुन्हेगारांना तिकीट दिले नाही.
यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागातील जागा वाटपाचा तिढा सुटेल. ज्या ठिकाणी बी फॉर्म जागा गेले आहेत त्या ठिकाणी मागे घेण्यात येतील. सगळ्या निवडणुका तुम्ही आठवा आमची सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे काही जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत.आम्ही ज्यांच्या बरोबर युती करतो त्यांनी त्या जागा कुणाला द्यायच्या हा त्यांचा अधिकार आहे. गुन्हेगारांना राष्ट्रवादीने तिकीट दिले नसल्याचे अजितदादा म्हणाले.
शेवटच्या क्षणापर्यंत गोंधळाचं वातावरण होतं कोणी यायचं एबी फॉर्म घेऊन जायचं.आमची सचिन खरात बरोबर युती झालेली आहे.काही जागा आम्ही त्यांना दिले आहेत. काही जागा आम्ही तुतारीवर लढवत आहोत.उदय सामंत यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांच्याबाबत बसून आम्ही काही जागांबाबत मार्ग निघतो का ते पाहू. पुणे पिंपरी चिंचवडसह काही ठिकाणी तिथल्या तिथल्या पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याला सांगितलं आहे.
उदय सामंतांशी बोलणं झाला आहे रात्री आम्ही बसून निर्णय घेऊ. विविध विकास कामांचा शुभारंभ बीडमध्ये करत आहोत आणि त्यासाठी मी बीडला चाललोय. आज मी उदयसामंतांशी बोलणार आहे काही ठिकाणी शिंदेसेना यांच्याशी बोलणार आहोत, अशी माहिती अजितदादांनी दिली.