पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा

| Updated on: Jan 17, 2021 | 11:06 PM

पिंपरी चिंचवड शहरातील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी झुंबा डान्स करत उपस्थितांची मनं जिंकली. मात्र यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्ज उडालेला दिसला.

पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा
Follow us on

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी झुंबा डान्स करत उपस्थितांची मनं जिंकली. मात्र यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्ज उडालेला दिसला. पिंपरी चिंचवड महापालिका, सायकल मित्र, अविरत श्रमदान आणि महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रिव्हर सायक्लोथॉन 2021 सायकल स्पर्धेत त्यांनी हा डान्स केला. इंद्रायणी नदीचे संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यासाठी सायक्लोथॉन स्पर्धा भरविण्यात आली होती. तेव्हा मनोरंजनासाठी झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार लांडगे स्वतःला डान्स करण्यापासून रोखू शकले नाहीत, मग त्यांनीही ठेका धरला आणि उपस्थितांची मनं जिंकली.

आमदार महेश लांडगे प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असतात. इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षण आणि तरुणांना व्यायामाचे, सायकल चालवण्याचे महत्व पटावे यासाठी या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आमदार लांडगे यांनी तरुणाईचा उत्साह वाढवण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी ‘तुझको मिरची लगी तो मै क्या करू’ या गाण्यावर नृत्य केले.

‘टाळ्या आणि शिट्ट्यांच्या नादात सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा’

आमदार महेश लांडगे यांच्या चाहत्यांनी यावर टाळ्या, शिट्ट्यांनी चांगलीच दादही दिली. मात्र, कोरोनाची पार्शवभूमी असतानाही या कार्यक्रमाला झालेली गर्दी, सोशल डिस्टनसिंगचा फज्जा, मास्क न वापरतात सहभागी झालेले स्पर्धक आणि स्वतः आमदार महेश लांडगे यांचंही बेफिकीर वागणं यामुळे कार्यक्रमाला काहीसं गालबोटही लागलं.

अखेर ब्रिटनहून परतलेले नागरिक सापडले, शोध घेण्यासाठी घ्यावी लागली पोलिसांची मदत

दरम्यान, पुण्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांचाही समावेश आहे. ब्रिटनहून परतल्यानंतर कोणतीही चाचणी न करता 35 प्रवासी विमानतळावरुन पळून गेले होते. अखेर पोलिसांची मदत घेऊन शोध घेतल्यानंतर हे 35 नागरिक सापडले होते. ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजीत आढळल्यानंतर एकूण 542 जण पुण्यात परतले होते. त्यापैकी 109 प्रवाशी कोरोना चाचणी न करता पळून गेले होते. त्यातील 35 जणांचा आता शोध लागला आहे. त्यानंतर आरोग्य प्रशासनाने त्यांची कोरोना चाचणी केली असून त्यातील 2 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या दोघांनाही पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी पुणे प्रशासनाने पोलिसांसाची मदत घेतली.

हेही वाचा :

अखेर ब्रिटनहून परतलेले नागरिक सापडले, शोध घेण्यासाठी घ्यावी लागली पोलिसांची मदत

पुण्याची धाकधूक वाढली, राज्यातील नव्या कोरोना स्ट्रेनचे तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे

4 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची तयारी सुरु, पुण्याच्या महापौरांची मोठी घोषणा

Zumba Dance of BJP MLA Mahesh Landage in Pimpri Chinchwad