पुण्याची धाकधूक वाढली, राज्यातील नव्या कोरोना स्ट्रेनचे तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे

कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वात आधी आणि जास्त फटका पुण्याला बसला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती होते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पुण्याची धाकधूक वाढली, राज्यातील नव्या कोरोना स्ट्रेनचे तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे

पुणे : कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वात आधी आणि जास्त फटका पुण्याला बसला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती होते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारण ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी 3 रुग्ण पुण्यात सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. याबाबत स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे (Corona New Strain patient found in Pune inform Rajesh Tope).

राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “ब्रिटनमधील नवीन कोरोना स्ट्रेनचे राज्यात आणखी 3 प्रवासी आढळले आहेत. तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे आहेत. यासह आता नव्या कोरोना स्ट्रेनचे राज्यात एकूण 11 प्रवासी झाले आहेत. राज्यात आज 3729 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. आज नवीन 3350 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. एकूण 18 लाख 56 हजार 109 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले. राज्यात एकूण 51 हजार 111 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.78 टक्के झाले आहे.”

“केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्या (8 जानेवारी) महाराष्ट्रातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 3 आरोग्य संस्था आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 1 आरोग्य संस्था याठिकाणी हा ड्राय रन घेण्यात येईल,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

‘पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 202 हे गंभीर’

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील याबाबत चिंता व्यक्ती केली आहे. ते म्हणाले, “दिवसभरात पुण्यात नवे 387 कोरोनाबाधित आढळले. पुणे शहरातील एकूण संख्या आता 1 लाख 80 हजार 674 इतकी झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात एकूण 5 हजार 43 टेस्ट करण्यात आल्या. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 9 लाख 46 हजार 617 इतकी झाली आहे. पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 202 झाली आहे ही गंभीर बाब आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 678 रुग्णांपैकी 202 रुग्ण गंभीर, तर 288 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. नव्याने 3 मृत्यूंची नोंद झालीय.”


“पुणे महापालिका हद्दीत नव्याने 3 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 4 हजार 663 इतकी झाली आहे. दिवसभरात 393 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील 393 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला. पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 1 लाख 73 हजार 333 झाली आहे,” असं नमूद करतानाच मोहोळ यांनी उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे धन्यवाद मानले.

पुणे कोरोना अपडेट (गुरुवार, 7 जानेवारी 2021)

◆ उपचार सुरु : 2,678
◆ नवे रुग्ण : 387 (1,80,674)
◆ डिस्चार्ज : 393 (1,73,333)
◆ चाचण्या : 5,043 (9,46,017)
◆ मृत्यू : 3 (4,663)

हेही वाचा :

4 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची तयारी सुरु, पुण्याच्या महापौरांची मोठी घोषणा

पुणेकरांनो सावधान! कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढण्यास सुरुवात, 35 दिवसांनंतर बुधवारी एका दिवसात 1 हजार 25 रुग्ण!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पुणेकरांनो काळजी घ्या, अजित पवार यांचं आवाहन

Corona New Strain patient found in Pune inform Rajesh Tope

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI