कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पुणेकरांनो काळजी घ्या, अजित पवार यांचं आवाहन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना सावध करत काळजी घेण्याचं आवाहन केलंय.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पुणेकरांनो काळजी घ्या, अजित पवार यांचं आवाहन
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 1:58 PM

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना सावध करत काळजी घेण्याचं आवाहन केलंय. दुसऱ्या लाटेची जरी शक्यता असली तरी पुणेकरांनी काळजी घ्यावी, घाबरुन जाऊ नये, असं अजित पवार म्हणाले. (DCM Ajit pawar Appeal punekar over Second Corona Wave)

पुणे पदवीधर संघाते महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ पुण्यात प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला अजित पवार यांनी उपस्थिती लावली आहे. अजित पवार यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी उपस्थिती लावली.

“पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत. यातच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जातीये. त्यामुळे कुणीही गाफील राहू नका, काळजी घ्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.मागील काही दिवसांत अनेक निष्पाप लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आपण जम्बो कोविड हॉस्पिटल उभारले आहे. आरोग्य यंत्रणेनेही चांगलं काम केलंय. त्यांनाही पुणेकरांनी सहकार्य करावं”, असं अजित पवार म्हणाले.

“कोरोनाच्या काळात मी खूप काळजी घेतली. पण तरीही एवढी काळजी घेऊन देखील मला कोरोनाची बाधा झालीच. माझ्यानंतर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटलांना देखील कोरोनाची बाधा झाली. पुणेकर मंडळींनी दुसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे”, असं ते म्हणाले. “कोरोनाची लस शोधण्याचं काम सुरु आहे. पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूट त्यावर काम करत आहे. कुणीही गाफिल राहू नका, काळजी घ्या”, असंही ते म्हणाले.

“जनसंपर्क अधिक असलेले व्यावसायिक, घरगुती कामगार, शासकीय कर्मचारी हे सुपर स्प्रेडरमध्ये येतात. या सुपर स्प्रेडरमुळेच कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत पुणेकरांनी आता ज्यादा काळजी घेणं उचित आहे. आपणा सर्वांनाच अधिकची काळजी घेऊन हे संभाव्य संकट टाळायचं आहे”, असंही ते म्हणाले.

(DCM Ajit pawar Appeal punekar over Second Corona Wave)

संबंधित बातम्या

‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, आरोग्य विभागाकडून भीती व्यक्त

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.