जितेंद्र आव्हाडांच्या कार्यक्रमापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये राडा, उल्हासनगरमध्ये काय घडलं?

उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीची कार्यकारणी जाहीर करण्याच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी राडा केला. यावेळी कार्यकर्त्यानी खुर्च्या फेकून खुर्च्यांची तोडफोड केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता.

जितेंद्र आव्हाडांच्या कार्यक्रमापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये राडा, उल्हासनगरमध्ये काय घडलं?
कार्यक्रमाच्या आगोदर फेकल्या खुर्च्या
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 8:39 AM

उल्हासनगर – जितेंद्र आव्हाडांचा (jitendra ahwad) उल्हासनगर (ulhasnagar) कार्यकारणी जाहीर करण्याचा कार्यक्रम आजोजित करण्यात आला होता. परंतु त्या कार्यक्रमाला अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तिथं अचानक कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात तिथल्या अनेक खुर्च्याची तोडफोड केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड हे कार्यक्रमाला उपस्थित राहण्या आगोदर हा गोंधळ झाला आहे. त्यामुळे कार्यक्रमात हा गोंधळ का झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी आज मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. तसेच आजच्या कार्यक्रमात कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार होती. खुर्च्या इकडे तिकडे फेकल्यावरून नाराज कार्यकर्त्यांनी असं केलं असावं असं वाटतंय. त्यावर अद्याप राडा का झाला यावर कोणताही खुलासा आलेला नाही. तिथं जमलेले सगळे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी पक्षाचे (national congress party) असल्याने तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये एकामेकात मतभेद असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

भाजपवरती टीका

काल झालेल्या राष्टवादी कार्यकारीणीच्या बैठकीत जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका निवडणुकीच्या अनुशंगाने तयारी सुरू असल्याचे जाहीर केले. तसेच ठाणे जिल्ह्यात सगळीकडे आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. काल झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांची हजेरी होती. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या प्रत्येक धोरणावर टीका केली. म्हणाले की, आता अनेक तरूण बेरोजगार त्यांच्यासाठी तरूणांनी काय केले. त्यांचं सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून नेमकं काय करतंय असा मला देखील प्रश्न पडलाय. तसेच महाविकास आघाडी सरकारचं महाराष्ट्रातील भविष्यातलं धोरण कसं असेल यावर सुध्दा त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे होणा-या महापालिकेच्या निवडणुकीत इथं महाविकास आघाडीचं सरकार असेल असंही त्यांनी तिथं सांगितलं आहे. केंद्राच्या नेतृत्वाकडून नुसत्या बाता मारल्या जातात. प्रत्यक्षात अंमलबंजावणी काहीचं होत नाही.

कार्यकारणीच्या बैठकीत नेमकं काय झालं

उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीची कार्यकारणी जाहीर करण्याच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी राडा केला. यावेळी कार्यकर्त्यानी खुर्च्या फेकून खुर्च्यांची तोडफोड केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या पूर्वी हा सगळा गोंधळ झाला. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. मात्र नक्की हा गोंधळ कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. या गोंधळानंतर जितेंद्र आव्हाडांकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, कसा आहे औरंगाबादेतला पुतळा?

बीड जिल्ह्याची बदनामी सुरु, पंकजांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा आरोप; बीडमधील मुलींच्या जन्मदराबाबतची माहिती चुकीची असल्याचाही दावा

जयप्रभा स्टुडिओ वादात नवं ट्विस्ट, राजेश क्षीरसागर यांची मागणी काय?

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.