पक्ष बदलण्याचा सल्ला राहुल गांधींचाच, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

अहमदनगर: काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गौप्यस्फोट केला. “अहमदनगर लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच दिला. त्यांची ही भूमिका पाहून धक्का बसला. राष्ट्रवादीने काँग्रेससाठी ही जागा सोडावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र स्वत: राहुल गांधीच पाठिशी राहिले नाहीत. त्यांनीच राष्ट्रवादीकडून तिकीट घेण्याची भूमिका घेतल्याने धक्का बसला”, …

Radhakrishna Vikhe patil press conference, पक्ष बदलण्याचा सल्ला राहुल गांधींचाच, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

अहमदनगर: काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गौप्यस्फोट केला. “अहमदनगर लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच दिला. त्यांची ही भूमिका पाहून धक्का बसला. राष्ट्रवादीने काँग्रेससाठी ही जागा सोडावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र स्वत: राहुल गांधीच पाठिशी राहिले नाहीत. त्यांनीच राष्ट्रवादीकडून तिकीट घेण्याची भूमिका घेतल्याने धक्का बसला”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

निवडणूक झाल्यावर कार्यकर्त्यांशी आणि राज्यातील काही लोकांशी बोलून निर्णय घेईन. पाण्याचा प्रश्न सोडवणे हा माझा प्रमुख मुद्दा असेल. – राधाकृष्ण विखे पाटील

दक्षिण नगरची जागा काँग्रेसला सोडावी ही मागणी करण्यात आली. शेवटी या जागेवर निर्णय घेऊ, असं सांगण्यात आले. 40 जागांचे निर्णय झाले, पण 8 जागांचा निर्णय झाला नव्हता. त्यात अनेक गोष्टी घडल्या. त्यात सुजय विखेंना दक्षिण नगरमध्ये उमेदवारी दिली जावी अशी मागणी होती. शरद पवार यांनी बाळासाहेब विखेंवर केलेल्या वक्तव्यांना मनाला वेदना झाल्या. नगरच्या जागेसाठी राहुल गांधींनाही भेटलो. भेटीत आलेले अनुभव धक्कादायक आहेत. काँग्रेसला जागा सोडावी अशी मागणी होती, राष्ट्रवादी तयार होत होती. राहुल यांनी राष्ट्रावादी कोणत्या कोट्यातून जागा देणार असे विचारले. त्यांनी मला राष्ट्रवादीतून उभे राहण्यास सांगितले. ते माझ्यासाठी धक्कादायक होते. मला राहुल गांधींनी आमच्या पाठीशी उभे राहावे असे वाटत होते. मात्र, त्यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली. यांचे दुःख झालं. त्यावेळी सुजय विखेंनी त्यांचा निर्णय जाहीर केला, असं राधाकृष्ण विखे यांनी सांगितलं.

अर्जुन खर्गेंच्या भेटीचे अनुभव धक्कादायक आहेत. एकीकडे चर्चा सुरु असताना शरद पवारांनी पुण्यातून मुक्ताफळं उधळली. राहुल गांधींनी राष्ट्रवादीकडून उभे राहायला सांगितलं. यापेक्षा धक्कादायक काही नाही. पक्षाचा नेता आमच्या मागे उभा राहिला नाही, याचं मला खूप दुःख झालं, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

काँग्रेस पक्षाने जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडली. संघर्ष यात्रा, आक्रोश मोर्चे यातून जे जे प्रश्न समाज्याच्या दृष्टीने महत्वाचे होते, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला झाला. ते सर्व प्रयत्न माझे एकट्याचे नव्हते, सामूहिकच होते. अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येऊ शकली नाही, पण नगरमध्ये जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आणली, असं विखे म्हणाले.

काँग्रेसचा नेता म्हणून काँग्रेस माझ्यामागे उभा राहू शकला नाही, म्हणून वडील म्हणून मी मुलाच्या पाठीशी उभा राहिलो. जेथे राष्ट्रवादीशी थेट सामना होता, त्यामुळे काँग्रेसच्या पक्षांना इतर ठिकाणी राष्ट्रवादीचा त्रास होऊ नये, म्हणून स्टार प्रचारक असातानाही प्रचाराला गेलो नाही. – राधाकृष्ण विखे पाटील

साडे चार वर्षात मी इतकं चागलं काम केलं, कुठल्या आमदारांची तक्रार नव्हती, काँग्रेसच्या कुठल्या जिल्हाध्यक्षांची तक्रार नव्हती, पण पक्षाने त्याचा विचार केला नाही. त्यांनी राजीनामा मंजूर केला त्याबद्दल त्यांचा आभारी. विरोधी पक्षनेत्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, त्यामुळं काँग्रेसची प्रतिमा उजळ झाली. माझे मुख्यमंत्र्यांचे संबंध फक्त मित्रत्वाचे होते, पण त्यावर बदनाम केलं गेलं. पण मी त्याचा गैरफायदा घेतला असं काही दिसलं नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केलं.

शरद पवार यांनी बाळासाहेब विखेंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार नाही हे सांगितले. आमच्याबद्दल पवारांचे विचार काय आहेत ते त्यांच्या वक्तव्यातून कळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जागेवर लढणे किंवा मदत करणे म्हणजे राजकीय आत्महत्या ठरेल, असं राधाकृष्ण विखे म्हणाले.

Radhakrishna Vikhe patil press conference, पक्ष बदलण्याचा सल्ला राहुल गांधींचाच, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

पक्षाची नोटीस आली नाही

पक्षाची नोटीस मला मिळाली नाही, ती नोटीस आली की काय भूमिका घ्यायची ते ठरवेन.

27/04/2019,1:37PM
Radhakrishna Vikhe patil press conference, पक्ष बदलण्याचा सल्ला राहुल गांधींचाच, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

बाळासाहेब विखेंना राष्ट्रवादीचा विरोध

अहमदनगरमध्ये पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी बाळासाहेब विखेंनी अनेक प्रयत्न केले. मात्र, विखेंना फायदा होईल, म्हणून राष्ट्रवादीने हा प्रश्न सोडवला नाही. ते खाते त्यांच्याकडे होते. – राधाकृष्ण विखे पाटील

27/04/2019,1:36PM

Radhakrishna Vikhe patil press conference, पक्ष बदलण्याचा सल्ला राहुल गांधींचाच, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

वैराला मर्यादा हवी

राजकीय क्षेत्रात वैर किती ठेवावे याला मर्यादा आहेत. माझ्या आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मैत्रीवरुनही चर्चा करण्यात आली. मात्र, अनेक नेते वेगवेगळ्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवतात, त्यांच्याबाबत अशी काहीही चर्चा होत नाही- राधाकृष्ण विखे पाटील

27/04/2019,1:36PM

Radhakrishna Vikhe patil press conference, पक्ष बदलण्याचा सल्ला राहुल गांधींचाच, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

त्यांनी भाऊबंदकीपर्यंत निवडणूक आणली

आम्ही राजकीय आत्महत्या करावी अशी भूमिका सर्वांकडून घेतल्या गेल्या. आता ही निवडणूक पवार वि. विखे अशी झाली. पवारांच्या मनात पूर्वग्रहदूषित मत आहे. सुजयच्या प्रचाराला जायला लागलं कारण पक्ष माझ्यामागे नाही. त्यामुळे मुलाच्या मागे राहावं लागलं. त्यांनी भाऊबंदकीपर्यंत निवडणूक आणली. – राधाकृष्ण विखे

27/04/2019,1:15PM
Radhakrishna Vikhe patil press conference, पक्ष बदलण्याचा सल्ला राहुल गांधींचाच, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

राहुल गांधींनी पक्ष बदलायला सांगितलं - विखे

खर्गेंच्या भेटीचा अनुभव धक्कादायक आहे. एकीकडे चर्चा सुरु असताना पवारांनी पुण्यातून मुक्ताफळं उधळली. राहुल गांधींनी राष्ट्रवादीकडून उभे राहायला सांगितलं. यापेक्षा धक्कादायक काही नाही. पक्षाचा नेता आमच्या मागे उभा राहिला नाही, याचं मला खूप दुःख झालं – राधाकृष्ण विखे

27/04/2019,1:11PM
Radhakrishna Vikhe patil press conference, पक्ष बदलण्याचा सल्ला राहुल गांधींचाच, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

बाळासाहेब थोरातांना टोला

नगरला राष्ट्रवादीचा तीनवेळा पराभव झाला. त्यामुळं ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी होती. पवारांना त्यासाठी भेटलो. पण आमच्याच पक्षातल्या नेत्यांनी ती जागा काँग्रेसला जाऊ नये यासाठी प्रयत्न केले. बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता टीका.

27/04/2019,1:09PM
Radhakrishna Vikhe patil press conference, पक्ष बदलण्याचा सल्ला राहुल गांधींचाच, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

'पवारांचं वक्तव्य वेदनादायी'

पवारांचं स्वर्गीय बाळासाहेब विखेंबद्दलचं वक्तव्य वेदनादायी – राधाकृष्ण विखे पाटील

27/04/2019,1:07PM
Radhakrishna Vikhe patil press conference, पक्ष बदलण्याचा सल्ला राहुल गांधींचाच, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

'नगरची जागा पवारांकडे मागितली'

पवार साहेबांना विनंती केली नगरची जागा द्या, पक्षाकडूनही या जागेची मागणी केली – राधाकृष्ण विखे पाटील

27/04/2019,1:07PM
Radhakrishna Vikhe patil press conference, पक्ष बदलण्याचा सल्ला राहुल गांधींचाच, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

'सर्वांना सोबत घेऊन काम केलं'

गेल्या साडेचार वर्षात पक्षाने जी जबाबदारी सोपवली, त्याद्वारे राज्यातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला, सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं

27/04/2019,1:02PM
Radhakrishna Vikhe patil press conference, पक्ष बदलण्याचा सल्ला राहुल गांधींचाच, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद

अहमदनगर :  काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद  

27/04/2019,1:00PM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *