राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेला, मेंदूमधून… देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका
उत्तराखंडातील ढगफुटी आणि पुरात महाराष्ट्रातील काही लोक अडकले आहेत. त्यांचा शोध घेण्याकरता आपण व्यवस्थापन करतोय, आपले जे काही लोक त्या ठिकाणी गेले आहेत ते सुखरूप परत आले पाहिजे, त्याचा शोध घेण्याकरिता व्यवस्था करीत आहोत.त्या ठिकाणी सर्व मदत करण्यासाठी गिरीश महाजन गेले आहेत असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ओबीसी राष्ट्रीय महाअधिवेशन गोव्यात पार पडले आहे. या अधिवेशनात भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या हिताचे निर्णय आपल्या सरकारनेच घेतल्याचे सांगितले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मी यापूर्वी देखील सामील झालो आहे, ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर आमच्या सरकारने केलेला काम हे या निमित्ताने ओबीसी समाजापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असतो असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
मला आज आनंद आहे या ठिकाणी ओबीसी महासंघाने देखील हे मान्य केलं, की महाराष्ट्रात आणि देशात गेल्या दहावर्षात 57 ओबीसी हिताचे निर्णय झाले त्यापैकी 50 निर्णय हे आमच्या सरकारने महाराष्ट्रात घेतले आहेत आणि 7 निर्णय हे पंतप्रधान मोदींनी घेतले आहेत असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ओबीसी समाजाच्या विविध मागण्या आहेत त्या पूर्ण करणारे आमचे सरकार आहे, आता नवीन काही मागण्या समोर आल्या आहेत. त्याही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याचे सुतोवाच केले आहे. याबद्दल तुमचे मत काय असे विचारता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा निर्णय ते घेतील, मला माहिती नाही, मी त्यांचे वक्तव्य ऐकले नाही त्यामुळे मला काही म्हणायचं नाही असेही स्पष्ट करीत काही बोलण्यास नकार दिला आहे.
सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत
कबुतरखाना बाबत सरकारमध्ये मतभेद आहे का ? असे विचारता सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मंगलप्रभात लोढा यांचे म्हणणे वेगळे होते. कोर्टाचा याबाबत निर्णय आणि जनतेचे हित यातून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लाडकी बहीण पुरुष लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मेंदू चोरीला गेला आहे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत व्होट चोरीचा आरोप केला आहे. याबाबत विचारता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ते यावेळी म्हणाले की मला याबाबत वाटते वाटते. त्यांनी एकदा त्यांनी चेक करावे, कदाचित त्यांचा एक तर मेंदू चोरीला गेला आहे किंवा मेंदू मधून चीप चोरीला गेली आहे म्हणून ते वारंवार असं बोलत असतील असा टोला
