AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला पहिला जबर धक्का, धाडधाड राजीनामे; रायगडमध्ये मोठी घडामोड

महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यामुळे शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना झालेली ही वाटाघाटी आवडलेली नाही. ही जागा राष्ट्रवादीसाठी सुटलेली असली तरीही या जागेच्या बदल्यात शिवसेनेला पालकमंत्रिपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे.

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला पहिला जबर धक्का, धाडधाड राजीनामे; रायगडमध्ये मोठी घडामोड
eknath shinde shivsenaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 06, 2026 | 6:12 PM
Share

Raigad Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात अनेक जागांवर निवडणूक बिनविरोध झाल्याने महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. या निवणुकीत एका प्रकारे महाविकास आघाडीची पिछेहाटच झाली आहे. या निवणुकीत रायगड हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात या जागेसाठी रस्सीखेच सुरू होती. परंतु ही जागा शिवसेनेला मिळण्याऐवजी राष्ट्रवादीला मिळाली. सध्या या जागेवर खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. परंतु महायुतीचा विजय झालेला असला तरीही येथे शिवसैनिकांत प्रचंड नाराजी पसरली आहे. याच नाराजीची पहिला धक्का आता शिवसेनेला बसला आहे आहे.

रायगडमध्ये नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यामुळे शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना झालेली ही वाटाघाटी आवडलेली नाही. ही जागा राष्ट्रवादीसाठी सुटलेली असली तरीही या जागेच्या बदल्यात शिवसेनेला पालकमंत्रिपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे. तरीदेखील पदाधिकाऱ्यांतील ही नाराजी दूर होताना दिसत नाहीये. त्याचा फटका म्हणून आता रायगडमध्या काही शिवसैनिकांनी आपले राजीनामे दिले आहेत. खालापूरचे माजी तालुकाअध्यक्ष संदेश पाटील यांच्यासह रायगडमध्ये शिवसेनेच्या एकूण 38 पदाधिकाऱ्यांनी राजीनामी दिले आहे. महेंद्र थोरवे यांनी अनिकेत तटकरे यांना सहकार्य केल्यामुळेदेखील हे राजीनामे देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

असली सत्ता आम्हाला नकोय

या राजीनाम्यावर बोलताना, आम्हाला असं वाटतंय की औरंगजेबाच्या सुतारवाडीच्या तहात आम्ही पराभूत झालो. आम्हाला हे डिवचण्याचं काम आहे. मी तालुका प्रमुखपदी होतो. सत्तेत असूनही त्या पदाचा मी राजीनामा दिला आहे. असली सत्ता आम्हाला नको आहे. आमची नाचक्की होईल, असली सत्ता आम्हाला नकोय, अशी भावना संदेश पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, रायगडमध्ये राष्ट्रवादीला आमदारकी मिळाली असल्याने आता शिवसेनेला पालकमंत्रिपद कधी दिलं जाणार? मंत्री भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी