AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahad Children Murder : नवऱ्याशी झालेल्या भांडणानंतर पत्नीने सहा मुलांना विहिरीत ढकलून मारले; महाड तालुक्यातील घटना

महाड येथील ढालकाठी गावात सदर महिला पती आणि सहा मुलांसह राहत होती. महिलेचा पती चिखुरी हा दररोज दारु पिऊन यायचा आणि महिलेला त्रास देत असे. पतीच्या या त्रासाला कंटाळेल्या या महिलेले सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले. तिने आपल्या सहाही मुलांना विहिरीत ढकलून दिले. पाच मुली आणि एका मुलाला आधी विहिरीत ढकलून दिले.

Mahad Children Murder : नवऱ्याशी झालेल्या भांडणानंतर पत्नीने सहा मुलांना विहिरीत ढकलून मारले; महाड तालुक्यातील घटना
नवऱ्याशी झालेल्या भांडणानंतर पत्नीने सहा मुलांना विहिरीत ढकलून मारलेImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 31, 2022 | 12:21 AM
Share

महाड : महाड तालुक्यातील ढालकाठी बोरगाव परीसरात एका आईने आपल्या पोटच्या पाच मुली आणि एका मुलाला विहिरीत ढकलून ठार मारल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. नवऱ्याबरोबर झालेल्या भांडणा (Dispute)च्या रागातून महिलेने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप तपास यंत्रणांनी याला दुजोरा दिलेला नाही. रुना चिखुरी सहानी (30) असे या आईचे नाव आहे तर चिखुरी सहानी असे पतीचे नाव आहे. सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यास बचाव पथका (Rescue Team)ला यश आले आहे. आरोपी महिला रुना आणि पती चिखुरी हे दोघेही महाड एमआयडीसी पोलिस (MIDC Police) ठाण्यात हजर झाले आहेत. शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर प्रक्रियेनंतर मुलांचे मृतदेह बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आधी मुलांना ढकलले, मग स्वतः उडी घेतली

महाड येथील ढालकाठी गावात सदर महिला पती आणि सहा मुलांसह राहत होती. महिलेचा पती चिखुरी हा दररोज दारु पिऊन यायचा आणि महिलेला त्रास देत असे. पतीच्या या त्रासाला कंटाळेल्या या महिलेले सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले. तिने आपल्या सहाही मुलांना विहिरीत ढकलून दिले. पाच मुली आणि एका मुलाला आधी विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर तिने देखील उडी मारली. मात्र याचवेळी जवळच्या आदिवासींनी तिला पाहिले आणि विहिरीतून बाहेर काढले आणि वाडीत आणले. यावेळी तिने हकीकत सांगितल्यानंतर सर्वांना धक्का बसला. महिलेचा जीव वाचला असला तरी सहा लहान मुलांचा नाहक जीव गेला आहे. सदर कुटूंब परराज्यातील असून ते ढालकाठी येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आल्याचे समजते. दरम्यान, या घटनेमुळे महाडमध्ये खळबळ उडाली आहे.

महाड तालुक्यातील खरवली बोरगाव हद्दीमधील ही घटना असून प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार मुलांचे मृतदेह हाती लागले आहेत स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस यंत्रणेने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (After a quarrel with husband the wife threw her six children into the well in mahad)

ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर.
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन..
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन...
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...