भारतमातेच्या जयघोषांनी रायगड दुमदुमला; स्वातंत्र्याची प्रेरणा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातून; संभाजीराजेंनी रायगडावर केले ध्वजारोहण

स्वराज्य व स्वातंत्र्याचे मूर्तीमंत शक्तिस्थळ असलेल्या दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने व शिवभक्तांच्या साथीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणे, ही अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब आहे अशी भावनाही छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या पोस्ट मधून व्यक्त केली आहेत.

भारतमातेच्या जयघोषांनी रायगड दुमदुमला; स्वातंत्र्याची प्रेरणा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातून; संभाजीराजेंनी रायगडावर केले ध्वजारोहण
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 11:59 AM

रायगडः भारताचा स्वातंत्र्यदिन (independence day) आज देशभर साजरा होत असतानाच माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Fromer MP Sambhajiraje) यांनी रायगडावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोठ्या ध्वजारोहण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने छत्रपती संभाजीराजे यांनी दुर्गराज रायगडवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi ka Amrit Mohostav) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी नगारखान्यासमोर ध्वजारोहण करून पोलीस प्रशासन व शेकडो शिवभक्तांसह त्यांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली. या महाराष्ट्रातील विविध भागातील शिवभक्त रायगडावरील ध्वजारोहणासाठी उपस्थित राहिले होते. पोलीस, सुरक्षारक्षक आणि शिवभक्तांनी भारतमाता की जय च्या घोषणांनी रायगड परिसर दुमदुमून सोडला होता.

स्वातंत्र्याची प्रेरणा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातून

रायगडावर ज्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत,त्याविषयी त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपला अनुभव शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, अगणित वीरांच्या बलिदानातून 1947 मध्ये आपला देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. या क्रांतिकारी लढ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यातून आली होती, असं हुतात्मा भगतसिंहांचे जीवनचरित्र आपल्याला सांगून जाते असंही त्यांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्याचा बाणा शिकविला

दुर्गराज रायगडवर सार्वभौम स्वराज्याची 6 जून 1674 रोजी स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षे परचक्रात सापडलेल्या भारतभूमीच्या सुपुत्रांना स्वातंत्र्याचा बाणा शिकविला असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमधून शेअर केले आहे.

स्वातंत्र्याचे मूर्तीमंत शक्तिस्थळ ; रायगड

स्वराज्य व स्वातंत्र्याचे मूर्तीमंत शक्तिस्थळ असलेल्या दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने व शिवभक्तांच्या साथीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणे, ही अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब आहे अशी भावनाही छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या पोस्ट मधून व्यक्त केली आहेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.