Fort Raigad | किल्ले रायगडावर अस्थी विसर्जनावरुन वाद, चौघा जणांविरोधात गुन्हा

| Updated on: Dec 12, 2021 | 7:47 AM

8 डिसेंबर रोजी दुपारी किल्ले रायगडावरील शिव समाधी स्थळी राखसदृश्य पावडर आणि पुस्तक पुजनावरून वाद निर्माण झाला होता. शिवप्रेमींनी समाधीस्थळावर निर्माण झालेल्या या वादाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल (Video Viral) केल्यानंतर घडल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता

Fort Raigad | किल्ले रायगडावर अस्थी विसर्जनावरुन वाद, चौघा जणांविरोधात गुन्हा
Follow us on

रायगड : किल्ले रायगडावरील (Raigad Fort) शिव समाधीसमोर राखसदृश्य पावडर आणि पुस्तक पूजन प्रकरणी चौघा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी रायगडावर विसर्जन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

8 डिसेंबर रोजी दुपारी किल्ले रायगडावरील शिव समाधी स्थळी राखसदृश्य पावडर आणि पुस्तक पुजनावरून वाद निर्माण झाला होता. काही जण पुस्तक पूजनाच्या नावाखाली बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या अस्थींचं किल्ले रायगडावर (Raigad Fort) विसर्जन करत आहेत, त्याचप्रमाणे ही राख चंदन आणि अत्तरामध्ये भिजवून शिव समाधीला लावत आहेत, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Sevak Samiti) पुण्यातील कार्यकर्त्या पूजा झोळे (Pooja Zole) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता.

चौघा जणांविरोधात गुन्हे

पूजा झोळे यांनी महाड तालुका पोलिस ठाण्यात धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक तेढ निर्माण करणे याप्रकरणी चार जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पूजा झोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सौरभ कर्डे, शैलेश वरखडे, ओंकार घोलप आणि किरण जगताप या चौघा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही पावडर केमिकल अॅनालिसिससाठी पाठवण्यात आली आहे. शिवप्रेमींनी समाधीस्थळावर निर्माण झालेल्या या वादाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल (Video Viral) केल्यानंतर घडल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. ही कारवाई केवळ कारवाई न होता दुष्कृत्य करणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक ठरावा अशी मागणी पूजा झोळे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : किल्ले रायगडावर अस्थी विसर्जनाचा घाट? मराठा सेवक समितीनं काय केलाय आरोप?