Shivsena-BJP: पेणचा आमदार बदलणार! राष्ट्रवादीनंतर आता शिंदे सेनेचा कोकणात भाजपविरोधात मोर्चा, बड्या नेत्याने बॉम्बच टाकला

Mahendra Dalvi on Ravi Patil: कोकणात गेल्या काही वर्षांपासून राजकीय शिमगा सुरू आहे. महायुतीमधील नेते एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडत नसल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत शिंदे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रायगडमध्ये रंगला होता. आता रायगड जिल्ह्यात सेनाविरुद्ध भाजप असा नवीन सामना सुरू झाला आहे.

Shivsena-BJP: पेणचा आमदार बदलणार! राष्ट्रवादीनंतर आता शिंदे सेनेचा कोकणात भाजपविरोधात मोर्चा, बड्या नेत्याने बॉम्बच टाकला
पेणचा आमदार बदलणार! राष्ट्रवादीनंतर आता शिंदे सेनेचा भाजपविरोधात मोर्चा
| Updated on: Nov 22, 2026 | 8:40 AM

Shivena Vs NCP-BJP: कोकणातील राजकीय शिमगा उभ्या महाराष्ट्राने अनुभवला आहे. रायगड जिल्ह्यात महायुतीमधील नेत्यांमधून विस्तवही जात नाही. या जिल्ह्यातील नेते एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने होत आहे. पालकमंत्री पद असो वा इतर मुद्दे शिंदे सेनेचे नेते राष्ट्रवादीवर तोंडसुख घेताना दिसतात. आता शिंदे सेनेने भाजपविरोधात मोर्चा उघडल्याचे दिसून येत आहे. पेणचा आमदार बदलणार, असे वक्तव्य करून आमदार महेंद्र दळवी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

महेंद्र दळवींचे भाजपला थेट आव्हान?

Loading...

अलिबागवर जेवढं प्रेम करतो, तेवढंच प्रेम पेण विधानसभा मतदारसंघावरही करतो. येणारा आमदार हा पेण विधानसभा मतदारसंघातून बदलणार, तुम्ही काळजी करू नका, असं मोठं विधान शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलं आहे. विशेष म्हणजे पेण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाजपचे रवी पाटील आहेत. त्यामुळे महेंद्र दळवी यांच्या या विधानातून भाजपलाच अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तिथले नेते काय करतात, याची आपल्याला माहिती नाही, असं म्हणत दळवी यांनी पेणच्या राजकारणावरही भाष्य केलं. त्यामुळे महायुतीत एकीकडे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा राजकीय शाब्दिक संघर्षाची चिन्हं दिसू लागली आहेत.

राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना

पालकमंत्री पद असो वा विधान परिषदेची निवडणूक, अजितदादांचा विमान अपघात असो वा इतर कोणताही मुद्दा शिंदे सेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रायगडमध्ये पाहायला मिळाला. पालकमंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे असा सामना दिसून आला. आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप नुकताच केला. राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याऐवजी त्यांनी कुटुंब वाढवल्याचे ते म्हणाले. तटकरे यांच्या राजकीय कारकि‍र्दीची उलटी गिनती सुरू झाली आहे, असा इशाराही त्यांनी दिला. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी तटकरे यांच्याविरुद्ध अत्यंत जहरी टीका केली होती. तर माणगावमधील कार्यक्रमात त्यांनी तटकरेंवर अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

तर यापूर्वी पालकमंत्री पदाचा वाद शमल्यानंतर महाएल्गार आंदोलनावरून सेना राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम दिसला. माझ्या मतदार संघात सुनील तटकरे यांनी कंपन्याना ब्लॅकमेल करू नये असा गंभीर आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला होता. खालापुरातील टाटा स्टील व गोदरेज कंपनी विरोधात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सर्व पक्षीय महायल्गार आंदोलन पुकारले होते. आता शिंदे सेनेने भाजपविरोधात मोर्चा उघडल्याचे दिसून येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us